खाजगी सावकारांच्या त्रासाला कंटाळून जामखेड तालुक्यातील अरणगावच्या तरुणाने गळफास घेऊन केली आत्महत्या! एकाला अटक, तिघांवर गुन्हा दाखल

कर्ज वसूल करण्यासाठी बऱ्याचदा खाजगी सावकारांच्या माध्यमातून धमक्या देणे किंवा इतर अनेक प्रकारचा त्रास कर्जदाराला दिला जातो व या मानसिक त्रासातून बऱ्याचदा आत्महत्या केल्याच्या घटना घडल्याचे आपण पाहतो.अशाच प्रकारची एक घटना जामखेड तालुक्यातील अरणगाव या ठिकाणाहून समोर आली असून या ठिकाणी खाजगी सावकारांच्या त्रासाला कंटाळून कालिदास अभिमन्यू मिसाळ या तरुणाने सोमवारी गळफास घेत आत्महत्या केली.

Ajay Patil
Published:

Ahilyanagar News: बऱ्याचदा खाजगी सावकाराकडून कर्ज घेतल्यामुळे कर्ज वसूल करण्यासाठी खाजगी सावकारांच्या माध्यमातून प्रचंड प्रमाणात त्रास दिला जातो व कर्जदारांकडून अव्वाच्या सव्वा स्वरूपामध्ये पैसे उकळले जातात.

कर्ज वसूल करण्यासाठी बऱ्याचदा खाजगी सावकारांच्या माध्यमातून धमक्या देणे किंवा इतर अनेक प्रकारचा त्रास कर्जदाराला दिला जातो व या मानसिक त्रासातून बऱ्याचदा आत्महत्या केल्याच्या घटना घडल्याचे आपण पाहतो.

अशाच प्रकारची एक घटना जामखेड तालुक्यातील अरणगाव या ठिकाणाहून समोर आली असून या ठिकाणी खाजगी सावकारांच्या त्रासाला कंटाळून कालिदास अभिमन्यू मिसाळ या तरुणाने सोमवारी गळफास घेत आत्महत्या केली.

या सगळ्या प्रकरणामध्ये आता पोलीस ठाण्यात तिघा सावकारांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केल्याची माहिती समोर आली आहे.

 खाजगी सावकारांच्या त्रासाला कंटाळून तरुणाची आत्महत्या

खासगी सावकारांच्या जाचाला कंटाळून तालुक्यातील अरणगाव येथील कालिदास अभिमन्यू मिसाळ (वय ४०) या तरुणाने सोमवारी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या प्रकरणी येथील पोलिस ठाण्यात तिघा सावकारांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

याप्रकरणी मृताचा भाऊ जगदीश अभिमन्यू मिसाळ (वय ४३, रा. अरणगाव, ता. जामखेड) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आलेश बाबूराव जगदाळे (रा. जामखेड), भगवान रामा जायभाय (रा. वंजारवाडी, ता. जामखेड) व शायरा नियमत सय्यद (रा. पाटोदा गरडाचे, ता. जामखेड) अशा तिघांविरोधात गुन्हा दाखल केला असून याप्रकरणी पोलिसांनी भगवान जायभाय यास सोमवारी रात्री उशिरा अटक केली.

आत्महत्या केलेला कालिदास मिसाळ याने आरोपी आलेश बाबूराव जगदाळे याच्याकडून दोन वर्षांपूर्वी शेतीच्या कामासाठी १ लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. त्याच्या मोबदल्यात कालिदास व त्याच्या मुलाने १४ महिने जगदाळे याच्या ट्रॅक्टरवर चालक म्हणून काम केले.

तरीही जगदाळे हा कालिदास याच्याकडे एक लाख रुपये कर्जाचे व्याज व मुद्दल असे एकूण ३ लाख रुपयांची मागणी करून धमकी देत होता. दुसरा सावकार भगवान रामा जायभाय याच्याकडून कालिदास याने ३० हजार रुपये घेतले होते. या कर्जाच्या व्याजापोटी जायभाय हा १ लाख २५ हजार रुपयांची मागणी करत होता.

तसेच शायरा नियामत सय्यद हिच्याकडून देखील कालिदास याने ३० हजार रुपये कर्ज घेतले होते. व्याजापोटी व मुद्दल असे मिळून ती ४० हजार रुपयांची मागणी करत होती.

पैशासाठी तीनही सावकार कालिदास याला त्रास देत होते.याच त्रासाला कंटाळून कालिदास याने १४ ऑक्टोबर रोजी पहाटे त्याच्या शेतातील लिंबाच्या झाडाला केबलच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

दरम्यान मृताने डायरीत लिहिलेल्या पानावर ‘आलेश बाबूराव जगदाळे व भगवान रामा जायभाय यांच्या त्रासाला कंटाळून मी आत्महत्या करीत आहे’ असे लिहिलेले आहे. याप्रकरणी पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक नंदकुमार सोनवलकर हे करीत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe