पाकिस्तानपेक्षा भाजपाला शेतकरी हा मोठा शत्रू वाटतो

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 7 नोव्हेंबर 2020 :- भाजपाला शेतक-यांची जिरवायची आहे त्यामुळे परदेशातून शेती माल आयात करण्यात येतो आहे. पाकिस्तानपेक्षा भजपाला शेतकरी हा मोठा शत्रू वाटतो अशी घणाघाती टीका महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

केंद्र सरकारने केलेल्या कृषी काय्दायविरोधात पंजाब आणि हरयाणा राज्य पेटून उठलं आहे. तिथे आजही आंदोलनं सुरु आहेत. अद्याप राज्यातील शेतक-यांना या कायद्यांचा चिमटा बसला नाही.

मात्र धोका कायम आहे असंही बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे. सांगलीमध्ये झालेल्या काँग्रेसच्या आंदोलनात ते बोलत होते. सध्याच्या घडीला शिल्लक साखरेचा प्रश्न गंभीर असताना निर्यात बंदी केली.

याचा अर्थ शेतक-यांची जिरवायची आहे. कांदा आयात करायला सुरुवात केली आहे. पाकिस्तानातून कांदा आयात करण्याची चर्चा आहे.

म्हणजेच आज देशातील भाजपा सरकारला पाकिस्तानपेक्षा शेतकरी हा त्यांचा मोठा शत्रू वाटतो आहे असं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे.

दुधाची भुकटीही मोठ्या प्रमाणात शिल्लक आहे. तरीही मोदी सरकार परदेशातून पावडर आयात करण्याचा निर्णय घेतं. दुधाचे भाव न वाढण्यास केंद्र सरकारच जबाबदार आहे. अशात कृषी कायदे आणले आहेत त्यामुळेच काँग्रेस या कायद्यांविरोधात आवाज उठवला आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe