अहमदनगर Live24 टीम ,9 जुलै 2020 : मागील काही दिवसांपासून अहमदनगरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. संगमनेरमध्ये कोरोनाचा विस्फोट होत असतानाचे चिंताजनक चित्र असताना आता श्रीरामपूरमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे.
श्रीरामपूर तालुक्यात करोना बाधितांची संख्या 38 वर जावून पोहोचली आहे. या पार्श्वभूमीवर श्रीरामपूर व्यापारी असोसिएशनने आज (गुरुवार) पासून चार दिवस ‘श्रीरामपूर बंद’ची घोषणा केली.
परंतु शहरातील काही व्यापार्यांनी एकतर्फी निर्णयाचा आरोप करून याला विरोध करत बंदमध्ये सहभागी होणार नसल्याचे स्प्ष्ट केले. त्यामुळे या बंदच्या पार्श्वभूमीवर शहरातील व्यापार्यांमधील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत.
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी बंद ठेवणे हा एक चांगला उपाय असल्याचा व्यापारी असोसिएशनच्या बैठकीत विषय झाला. तर दुसरीकडे , अशाप्रकारे चार दिवस बंद ठेवून करोनाची साखळी तुटली जाणार नाही अशी परिस्थिती आहे.
त्यामुळे बंद ठेवणे हाच एक पर्याय आहे का? त्यावर प्रशासनाने कडक नियम लावून कडक निर्बंध ठेवल्यास नागरिकांवर त्याचा परिणाम होणार नाही का? अगोदरच चार महिने वेगवेगळ्या प्रकारचे लॉकडाऊन घेण्यात आले.
यात लहान मोठ्या सर्वच व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. त्यामुळे आर्थिक घडी विस्कटल्यामुळे व्यापारी आता बंद ठेवण्याच्या मानसिकतेत नाहीत. त्याचमुळे काही व्यापार्यांनी या बंदला विरोध दर्शविला आहे
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews