प्रशिक्षणार्थी आयएएस पूजा खेडकरांचे वडील विधानसभेसाठी मागणार भाजपकडे उमेदवारी; नाहीतर…..

बहुचर्चित असलेल्या निलंबित आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर लोकसभा निवडणुकीनंतर पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीसाठी उभे राहणार  असून त्याकरिता भाजपकडे उमेदवारी मागण्याची त्यांची तयारी सुरू आहे.

Ajay Patil
Published:
dilip khedkar

Ahilyanagar News: बहुचर्चित असलेल्या निलंबित आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर लोकसभा निवडणुकीनंतर पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीसाठी उभे राहणार  असून त्याकरिता भाजपकडे उमेदवारी मागण्याची त्यांची तयारी सुरू आहे.

जर भाजपने उमेदवारी दिली नाही तर अपक्ष विधानसभा निवडणूक लढवण्याचा  निर्धार त्यांनी पाथर्डी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलून दाखवला आहे. आपल्याला माहित आहे की, सेवानिवृत्त सनदी अधिकारी दिलीप खेडकर यांनी आरोप केले होते की

राजकीय सुडापोटी पूजा खेडकर यांना त्रास दिला गेला व त्यांनी थेट मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावरच निशाणा साधला होता. यावेळी देखील त्यांनी आयोजित पत्रकार परिषदेच्या माध्यमातून जवळपास याच आरोपांची  पुनरावृत्ती केली.

 दिलीप खेडकर मागणार विधानसभेसाठी भाजपकडे उमेदवारी

निलंबित प्रशिक्षणार्थी आएएस पूजा खेडकर हिचे वडील सेवानिवृत्त सनदी अधिकारी दिलीप खेडकर विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडे उमेदवारी मागणार आहेत. भाजपने उमेदवारी न दिल्यास अपक्ष लढण्याचा निर्धार त्यांनी पाथर्डी येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला आहे.यावेळी भाजपचे माजी पाथर्डी तालुकाध्यक्ष माणिक खेडकर उपस्थित होते.

शासकीय यंत्रणेचा गैरवापर करत माझ्या कुटुंबाला त्रास देण्याचा उद्योग जरी जिल्ह्यातील राजकीय नेत्यांनी केला. असे असले तरीही पुन्हा एकदा जोमाने लढणार आहे. स्वकष्टाने सनदी अधिकारी झालो. निवृत्त झाल्यानंतर गावचा चेहरामोहरा बदलला. मराठा-ओबीसी संघर्षात ओबीसींची बाजू घेतली.

मात्र, मराठा समाजाला विरोध केला नाही. लोकसभेला उभा राहिलो अन् माझ्या मुलाबाळांपर्यंत राजकारण करण्यात आले, असे सांगून खेडकर म्हणाले, पूजा खेडकर जॉईन झाल्याच्या पहिल्या दिवसापासून तिला त्रास देण्यास सुरुवात करण्यात आली तिच्या विरोधात अहवाल बनवून तो परस्पर मीडियाला देण्यात आला.

ज्या शेतजमिनीच्या संदर्भात अगोदर एनसी दाखल होती, त्याच प्रकरणात आमच्यावर वेगळा गुन्हा दाखल करण्यात येऊन हा गुन्हा क्राईम ब्रँचकडे वर्ग करण्यात आला. आमच्या तपासासाठी पोलिसांची विविध पथके तैनात करण्यात आली. अधिकाऱ्यांवर राजकीय दबाव आणण्यात आला, अशी टीका त्यांनी जिल्ह्यातील नेत्यांवर नाव न घेता केली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe