अहमदनगर Live24 ,19 जून 2020 : चीनने भारतीय सिमेवर घुसखोरी करुन भारतीय जवानांवर हल्ला केल्याचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने निषेध नोंदविण्यात आला. तर या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रध्दांजली वाहण्यात आली.
यावेळी आमदार संग्राम जगताप, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा.माणिक विधाते, नगरसेवक गणेश भोसले, अजिंक्य बोरकर, साधना बोरुडे उपस्थित होते.

शहरातील आयुर्वेद महाविद्यालय येथे फिजीकल डिस्टन्स व नियमांचे पालन करुन शहिदांना श्रध्दांजली वाहण्यात आली. संग्राम जगताप म्हणाले की, कोरोना महामारीला चीन कारणीभूत ठरला आहे. जगासह भारतात कोरोनाची डोकेदुखी वाढत आहे.
तर दुसरीकडे भारताच्या हद्दीत विश्वासघातपणे घुसखोरी करुन चीनने भारतीय जवानांवर हल्ला केला आहे. यापुर्वी देखील अनेकवेळा चीनने घुसखोरी केली असून, त्यांचे या कुरापती सुरुच आहेत.
चीनला धडा शिकवण्यासाठी नागरिकांनी चीनी उत्पादनावर स्वयंफुर्तीने बहिष्कार टाकला पाहिजे. विधानसभेत देखील चायना मालावर बंदी आनण्यासाठी राष्ट्रवादी पुढाकार घेणार असून, महाराष्ट्रासह देशात चायना उत्पादनावर बंदी कशी आनता येईल?
या दृष्टीने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व खासदार सुप्रियाताई सुळे यांच्याकडे मागणी केली जाणार आहे. चीनला धडा शिकवण्यासाठी कायदेशीर रित्या देखील बंदोबस्त करावा लागणार असल्याचे सांगून,
चीनच्या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रध्दांजली वाहून वीर पत्नी व मातांना त्यांनी सलाम केला. प्रा. माणिक विधाते यांनी भारतीय बाजारपेठेत सर्वाधिक चायना माल विकला जात असून, या मालावर नागरिकांनी बहिष्कार टाकल्यास चीनला मोठा आर्थिक फटका बसणार आहे. वीर जवानांना स्मरण करुन प्रत्येक भारतीयांनी चायना माल न घेण्याचे त्यांनी आवाहन केले.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews