पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीला ट्रकची धडक; पाणीपुरवठा होणार विस्कळीत

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 05 फेब्रुवारी 2021:- कोपरगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हला ट्रकची धडक बसल्याने त्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

त्यामुळे पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून दुरुस्तीनंतरच शहराचा पाणीपुरवठा सुरळीत होईल, अशी माहिती नगरपालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

कोपरगाव शहरातील नगर- मनमाड महामार्गावरील टिळेकर वस्ती, साईधाम कमानीसमोर गुरुवारी (दि. ४) फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास सातारा येथून मालेगावच्या दिशेने गूळ घेऊन जाणाऱ्या

ट्रकने (क्रमांक एमएच १८ बीजी ०२७७) नगरपालिकेच्या कोपरगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हला जोराची धडक दिली. या धडकेत या जलवाहिनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News