अहमदनगर Live24 ,13 मे 2020 :- अल्पवयीन मुलीचे लग्न गुपचूप लावण्याचा प्रयत्न कोपरगाव पोलिसांनी हाणून पाडला. ही घटना तालुक्यातील जेऊर पाटोदा येथे मंगळवारी सकाळी घडली.
याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी पोलिस पाटील हरिभाऊ सयाजी केकान (जेऊर पाटोदा) यांनी फर्याद दली.
यात आरोपी नारायण आगाजी अव्हाने, अल्काबाई नारायण अव्हाने, विकास सोपान चव्हाण, सोपान आनंदा चव्हाण, सुलोचना सोपान चव्हाण यांच्याविरुद्ध गुन्हा दखल करण्यात आला.
आरोपी नारायण आगाजी अव्हाने, अल्काबाई नारायण अव्हाने यांनी त्यांची मुलगी अल्पवयीन असताना तिचे लग्न यातील विकास चव्हाण याच्याशी ठरवून मंगळवारी रोजी माळ घालून लग्न करून देणार होते.
मुलगी अल्पवयीन आहे हे माहीत असतानाही आरोपी हा लग्न करण्यासाठी तयार होता. तसेच सोपान आनंदा चव्हाण, सुलोचना सोपान चव्हाण त्यांच्या मुलाच्या लग्नासाठी तयार झाले होते. याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर
- ब्रेकिंग बातम्यांसाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज
https://www.facebook.com/ahmednagarlive24 - जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews - Ahmednagarlive24 ला फॉलो करा ट्वीटर वर
https://twitter.com/Ahmednagarlive
This Story First Publish on Ahmednagarlive24.com