जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून चोऱ्यांचे सत्र वाढले आहे. कोरोना महामारीच्या संकटातून काहीशे बाहेर आले असताना या चोऱ्यांच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सोने – चांदी, दागिने, रोकड आदी चोरीच्या घटनांनंतर आता जनावरांची चोरी होत असल्याची एक घटना उघडकीस आली आहे. कोपरगाव तालुक्यात म्हशी चोरीप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली. एक जण मात्र फरार झाला.
![](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2020/05/arrested-new_2017071184.jpg)
शहरातील गोकूरबाबा गल्लीत राहणारे अजहर इस्माईल शेख यांनी आपल्या गोठ्यातील सव्वा लाख किमतीच्या दोन म्हशी मंगळवारी रात्री आकाश संजय रोकडे,
हरिश चंद्रकांत कुऱ्हाडे व सचिन गायकवाड (खेडकरगल्ली, कोपरगाव) यांनी चोरून नेल्याची फिर्याद दिली होती. सहायक पोलिस निरीक्षक दीपक बारसे, हेड कॉन्स्टेबल पुंड, कॉन्स्टेबल सूरज अग्रवाल,
पोलिस नाईक कोरेकर, शिंदे यांनी सापळा लावून व पाठलाग करून आरोपींना ताब्यात घेतले. त्यांनी गुन्हा कबूल केला. याप्रकरणात पोलिसांनी दोघांना अटक केली असून एक जण मात्र फरार झाला आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved