भिंत अंगावर कोसळून दोन चिमुरड्यांचा मृत्यू

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 ,19 जून 2020 :  श्रीरामपूर येथे घराचं बांधकाम सुरू असताना ट्रॅक्टरचा धक्का लागल्याने भिंत कोसळली. यात दोन चिमुकल्या मुलींचा मृत्यू झाला. बेलापूर गावातील बोंबले वस्तीवर ही हृदयद्रावक घटना घडली.

ॠतूजा बाळासाहेब गांगुर्डे व श्रृतीका बाळासाहेब गायकवाड (वय ५ वर्षे) असे मृत मुलींचे नावे आहेत. वस्तीवर राहणारे बाळासाहेब गांगुर्डे यांच्या घराचं बांधकाम सुरू होते. त्याचवेळी डबर खाली करण्यासाठी आलेल्या ट्रॅक्टरचा धक्का घराच्या भिंतीला लागला.

त्यामुळे भिंत कोसळली. यात दोघीही भिंतीखाली दबल्या गेल्या. आजूबाजूच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि दोघींनाही भितींखालून काढण्यात आले.

जखमी झालेल्या श्रृतीका आणि ॠतूजा या दोघींनाही श्रीरामपूर इथल्या साखर कामगार हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. परंतु त्यांना मृत घोषित करण्यात आलं.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment