अहमदनगर Live24 ,1 जून 2020 :- शनिवार सायंकाळपाठोपाठ रविवारी दुपारी राहुरी तालुक्यात आत्महत्येची घटना घडली. या दोन्ही आत्महत्या नैराश्यातून झाल्याचे सांगितले जाते.
रविवारी दुपारी तालुक्यातील वरशिंदे येथील गौतम भाऊसाहेब विधाते (वय ३५) यांनी राहत्या घरात गळ्याला दोर अडकवून गळफास घेतला.
नातेवाईकांनी गौतमला राहुरी ग्रामीण रूग्णालयात नेले, मात्र उपचारांपूर्वीच तो मृत झाल्याचे डाॅक्टरांनी सांगितले. सायंकाळी राहुरी येथे शवविच्छेदनानंतर गौतमचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. शनिवारी सायंकाळी गोटुंबा आखाडा येथील हरिष राजेंद्र सजगुरे (वय २३) याने राहत्या घरात गळ्याला दोर अडकवून गळफास घेतला.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews