Ahmednagar Rain : पाथर्डी तालुक्यातील सोनोशी, दैत्यनांदुर, जिरेवाडी, औरगंपूर, कळसपिंप्री, तोंडोळी, जळगाव, फुंदेटाकळी, येळी, परिसरात, दोन दिवस झालेल्या दमदार पावसामुळे शेतातील पिकांना जीवदान मिळाले असून, पाऊस पाऊस झाल्याने परिसरातील शेतकऱ्यांत समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
यावर्षी पावसाळयाचे साडेतीन महिने कोरडे गेले. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते. जून महिन्यात झालेल्या अल्पपावसावर काही शेतकऱ्यांनी पेरणी केली होती;
परंतू दोन अडीच महिन्यांपासून पाऊस गायब झाल्याने केवळ पावसाअभावी, नगदी पिके, वाया जाण्याच्या मार्गावर होती तर पशुधनाच्या चाऱ्याचा तसेच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भेडसावू लागला होता;
परंतु सलग दोन दिवस झालेल्या दमदार पावसाने कोरडगाव वगळता अनेक गावांतील ओढे नाल्यांना पाणी वाहू लागले आहे, या पावसामुळे शेतातील पिकांना जीवदान मिळाले. असून, पाऊस झाल्याने परिसरातील शेतकऱ्यांत समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.