साकुरी : शिर्डी शहरातील काटकर वस्तीवरील अर्चना लक्ष्मण काटकर (वय ३६) व मुलगा सागर लक्ष्मण काटकर (वय १५) मायलेक दि. २९ जानेवारी रोजी सकाळी ५ वाजेच्या सुमारास राहत्या घरातून निघून गेले.
शोधाशोध करूनही तपास लागत नसल्याने राहाता तालुक्यातील लोहगाव येथील सोनाली अमोल वढांगळे यांनी शिर्डी पोलिसांत मिसिंगची तक्रार दिली आहे.
त्या आधारे शिर्डी पोलिासांनी मिसिंग दाखल केली आहे. पुढील तपास ठाणे अंमलदार बबनराव माघाडे हे करीत आहेत.
कोणाला काही माहिती असेल तर याबाबत शिर्डी पोलिसाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.