कारच्या धडकेत दोन शेळ्या ठार; सात गंभीर जखमी

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 8 जानेवारी 2021 :-संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील खंदरमाळडी शिवारातील पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर कार चालविणार्‍या चालकाने शेळ्यांना धडक दिल्याने दोन शेळ्या जागीच ठार झाल्या आहे.

तर सात शेळ्या गंभीर जखमी झाल्या आहेत. याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, खंदरमाळवाडी शिवारातील गोकुळवाडी येथे सदाशिव बबन लेंडे हे शेतकरी तथा पशुपालक आपल्या शेळ्या चारण्यासाठी एकोणावीस मैल येथून पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गाने जात होते.

त्याचवेळी पाठीमागून बेदरकारपणे भरधाव वेगात येत असलेल्या कारचालकाचे नियंत्रण सुटल्याने कार थेट शेळ्यांच्या कळपात घुसली आणि दोन शेळ्यांचा जीव घेतला.

तर सात शेळ्या गंभीर जखमी झाल्या. अपघातानंतर पशुपालक लेंडे यांनी कारचालकाला काठीच्या माध्यमातून थांबविण्याचा आटोकाट प्रयत्नही केला.

परंतु, कारचालकाने कार न थांबविता कार थेट लेंडे यांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न करुन पळून गेला आहे. सदर अपघाताची माहिती समजताच आजूबाजूच्या शेतकर्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली.

व जखमी झालेल्या सर्व शेळ्यांना बाजूला घेऊन तात्काळ खासगी पशुवैद्यकांना पाचारण केले. या अपघाताची माहिती उपस्थित नागरिकांनी घारगाव पोलिसांना दिली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment