नगर-पुणे रोडवर शिवनेरी बसच्या धडकेत दोघे जखमी

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर : नगर-पुणे रोडवरील चास शिवारात शिवनेरी बसने मोटारसायकलला धडक दिल्याने अपघात झाला. अपघातात ललिता विनोद पवार व विनोद विश्वनाथ पवार (रा. कारंजी अकोला) हे दोघे जखमी झाले आहेत.

ही घटना ८ फेब्रुवारीला घडून ९ फेब्रुवारी रोजी नगर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ललिता विनोद पवार यांनी फिर्याद दाखल केली. पवार हे मोटारसायकलवरुन जात असताना शिवनेरी बसच्या (क्र.एमएच ११, टी ९२५६) चालकाने हयगयीने वाहन चालवून धडक दिली.

या अपघातात ललिता पवार व विनोद पवार हे जखमी झाले आहेत. पुढील तपास पोहकॉ. फोलाने हे करत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment