अहमदनगर Live24 ,6 मे 2020 :- संगमनेर तालुक्यातील दोन घटनांमध्ये दोन ठिकाणाहून दोन अल्पवयीन तरुणींना पळवून नेण्याचा प्रकार भरदुपारी व रात्री घडल्याने तालुक्यात पालक वर्गात खळबळ उडाली आहे
याप्रकरणी तालुका पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की संगमनेर तालुक्यातील निमोण परिसरात राहणाऱ्या एका कुटुंबातील १७ वर्ष ८ महिने वयाच्या अल्पवयीन मुलीला रात्री १२ च्या सुमारास अज्ञात आरोपीने अज्ञात कारणासाठी फूस लावून पळवून नेले.
मुलीच्या वडिलांनी तालुका पोलिसात फिर्याद दिल्यावरुन अज्ञात आरोपीविरुद्ध भादवि कलम ३६३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला . पोनि पाटील यांच्याा मार्गदर्शनाखाली हेकॉ पठाण हे पुढील तपास करीत आहेत.
दुसऱ्या घटनेत तालुक्यातील नांदूर खंदरमाळ भागात राहणाऱ्या एका कुटुंबातील १७ वर्ष ४ महिने वयाच्या अल्पवयीन मुलीला भरदिवसा दुपारी २ . ३० वा साहिल आडेप या आरोपीने अमिष दाखवून फूस लावून पळवून नेले.
मुलीचे वडील यांनी घारगाव पोलिसात फिर्याद दिल्यावरुन आरोपी साहिल कृष्णा आडे प , रा पद्मानगर , मालदाड , रोड , संगमनेर याच्याविरुद्ध भादवि कलम ३६३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
काल हा प्रकार घडला . पोना लंघे हे पुढील तपास करीत आहेत. संचारबंदी, लॉकडाऊन असतानाही तालुक्यात दोन अल्पवयीन तरुणींना पळवून नेण्याचा प्रकार घडला.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर
- ब्रेकिंग बातम्यांसाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज
https://www.facebook.com/ahmednagarlive24 - जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews - Ahmednagarlive24 ला फॉलो करा ट्वीटर वर
https://twitter.com/Ahmednagarlive
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®