Ahmednagar News : नगर अर्बन बँक घोटाळ्याप्रकरणी आणखी दोघांना अटक, त्यापैकी एक गवंडी ! ‘या’ गवंड्याच्या नावावर ३ कोटींचे कर्ज

Published on -

नगर अर्बन बँक घोटाळ्याप्रकरणी एक महत्वाची अपडेट बातमी पुन्हा समोर आली आहे. या घोटाळाप्रकरणातील आरोपींची धरपकड सुरूच असून आता पुन्हा आर्थिक गुन्हे शाखेने नगर अर्बन बँक मुख्य कर्ज तपासणी अधिकारी आरोपी मनोज वसंतलाल फिरोदिया आणि कर्जदार प्रवीण सुरेश लहारे याला अटक केली आहे.

ही अटकेची कारवाई आज (दि. 20) रोजी करण्यात आली आहे. प्रवीण लहारे हा एक गवंडी काम करणारा कामगार असून त्याच्या नावावर मात्र ३ कोटींचे कर्ज आहे व ते आता ६ कोटींवर गेले असल्याची माहिती मिळाली आहे.

नगर अर्बन बँक घोटाळा प्रकरणात सध्या पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके यांनी धडाकेबाज कारवाई सुरु केली आहे. या अटक सत्रामुळे तपासाला योग्य दिशा मिळाली आहे. त्यामुळे नवनवीन माहिती तपासात समोर येत आहे.

  • गवंडी काम करणाऱ्या लहारेच्या नावावर करोडोंचं कर्ज

  • डीवाएसपी मिटके यांच्या पथकाने ज्या दोन लोकांच्या अटकेची कारवाई केली आहे त्यातील एक प्रवीण लहारे हा एक गवंडी काम करणारा कामगार असून त्याच्या नावावर त्यावेळी 3 कोटी रुपयांचं कर्ज असल्याचं दाखविण्यात आलं असून आता त्या कर्जाची थकबाकी 6 कोटी रुपयांपर्यंत गेली असल्याची माहिती मिळाली आहे.

  • वाळकी रस्त्यालगत कर्जदार प्रवीण लहारेच्या नावावर जमीन असून त्या जमिनीचं व्हॅल्युएशन 25 लाख रुपयांपर्यंत देखील जात नाही. परंतु तरीही या 25 लाखांच्या तारणावर तब्बल कोट्यवधींचा कर्ज मंजूर करण्यात आलं असल्याची माहिती समजते. सध्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने आपली तपासाची चक्रे जोरात फिरवली आहेत. परंतु काही ‘मोठे मासे’ पोलिसांच्या गळाला कधी लागतात, याचीच चर्चा सध्या बँकेच्या ठेवीदारांसह नागरिकांत आहे.
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News