अहमदनगर ब्रेकिंग : स्कार्पिओच्या धडकेत दुचाकीवरील दोघांचा मृत्यू

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / पारनेर :- रस्ता ओलांडण्यासाठी रस्त्याच्याकडेला थांबलेल्या मोटारसायकलला भरधाव वेगातील स्कार्पिओने जोरात धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाल्याची घटना पारनेर तालुक्यातील पुणे – नगर महामार्गावरील पळवे फाटा येथे दि.२२ रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या दरम्यान घडली.

याबाबत सविस्तर असे की, पळवे फाटा येथे मोटारसायकलस्वार महामार्ग ओलांडण्यासाठी थांबलेला असताना पुणे कडून भरधाव येणारी स्कॉरपिओ (क्र.एमएच १६ बीवाय ४४२८) वरील चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून बेजबाबदारपणे आपल्या ताब्यातील वाहन हयगईने चालून स्प्लेंडर मोटारसायकल स्वाराला जोराची धडक दिली.

त्यामुळे खंडू जयवंत शेरकर (रा.सोबलेवाडी ता.पारनेर) व ज्ञानदेव दगडू बुगे (रा.बुगेवाडी ता.पारनेर) या दोघांचा मृत्यू झाला. या आपघातात दुचाकीचा अक्षरश: चक्काचूर झाला.

स्कॉर्पिओ चालक मदत न करता व अपघाताची खबर न देता गाडी सोडून पळून गेला. पुणे -नगर महामार्गावरील अपघातांची मालिका थांबविण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली जात आहे.

याप्रकरणी सागर बाबाजी जाधव (वय – २२ रा.पळवे बुद्रूक) यांच्या फिर्यादीवरून सुपा पोलिसांनी स्कॉर्पिओ चालका विरुद्ध दोघांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याबाबतचा तसेच वाहनाच्या नुकसानी बाबतचा गुन्हा दाखल केला आहे.

This Story First Publish on Ahmednagarlive24.com
No1 News Network Of Ahmednagar
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment