अहमदनगर Live24 टीम,19 सप्टेंबर 2020 :-अन्यायाला वाचा फोडण्यासाठी शेतकऱ्याला कोणत्या ठरला जावे लागेल याची काही कल्पना येत नाही.असाच एक प्रकार शिर्डीमध्ये घडला. आपल्या मागण्या मांडण्यासाठी या शेतकऱ्याने अधिकाऱ्यांसमोरच विहिरीत उडी घेतली.
रुई-निघोज रस्त्याच्या कामादरम्यान पाणी वाहून जाण्यासाठी पाइप टाकण्याकडे अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले. दर वर्षी पावसाळ्यात शंभर एकरांत पाणी साठून पिके सडू लागली.
अर्ज-विनंत्या करून, अधिकाऱ्यांच्या कार्यालयांचे उंबरठे झिजवूनही यावर काही उपाय योजना करण्यात आल्या नाहीत. या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रावसाहेब देशमुख
यांनी चक्क तुडुंब भरलेल्या विहिरीत अधिकाऱ्यांसमोर उडी घेतली. त्यामुळे अधिकाऱ्यांची एकच धावपळ उडाली. विहिरीत पोहतच देशमुख यांनी अधिकाऱ्यांसोबत बोलणी सुरू केली. चोवीस तासांत प्रश्न सोडवू, असे आश्वासन त्यांनी दिले.
अर्ध्या तासाच्या चर्चेनंतर देशमुख यांनी पोहणे थांबविले व हा विषय थांबला गेला. शेतकऱ्यांच्या सदर जमीनीपलीकडे रस्त्याच्या पलीकडे ओढा आहे. तो या रस्त्याने अडला. पाइप टाकण्याकडे अधिकाऱ्यांनी कानाडोळा केला.
यंदा मुसळधार पाऊस झाल्याने या ठिकाणी शेतजमिनींना तळ्याचे स्वरूप आले. तक्रारीनंतर अधिकारी दरवर्षीप्रमाणे पाहणीसाठी आले.
त्या वेळी देशमुख यांनी त्यांच्यासमोरच विहिरीत उडी घेतली. शेतातील पाणी ओढ्यात काढले जात नाही तोपर्यंत पोहत राहू, असा पवित्रा घेतला. अभियंता कुलकर्णी यांनी चोवीस तासांत ओढ्यात पाणी काढून देण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर त्यांनी आंदोलन मागे घेतले.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved