दुर्दैवी घटना : अपघातात नवविवाहितेचा जागीच मृत्यू !

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 11 डिसेंबर 2020 :- ट्रक व मोटारसायकलची टक्कर होऊन झालेल्या अपघातात लोणीव्यंकनाथ येथील चार मुले जागीच ठार झाल्याची घटना ताजी असतानाच श्रीगोंद्यात आज आणखी एक अपघात झाला आहे.

नगर-सोलापूर महामार्गावर दोन मोटारसायकलची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात अंकीता प्रशांत वाल्हेकर (वय २२, रा. थिटे सांगवी) ही नवविवाहिता जागीच ठार झाली.

हा अपघात बनपिंपरी शिवारात गुरुवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास झाला.प्रशांत वालेकर यांच्या मोटारसायकलला समोरच्या मोटारसायकलने चुकीच्या बाजूने येऊन धडक दिली.

या अपघातात प्रशांत वाल्हेकर हेही जखमी झाले आहेत.अंकिता व प्रशांत यांचे दीड वर्षापूर्वी लग्न झाले होते. ह्या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe