अवकाळी पावसामुळे बळीराजाच्या चिंतेत भर; पिकांचे अतोनात नुकसान

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 13 मार्च 2022 Ahmednagar News :- नेवासा तालुक्यातील अनेक भागांमध्ये वादळी वार्‍यासह व विजांच्या कडकडाटासह झालेल्या अवकाळी पावसाने बळीराजाचे मोठे नुकसान केले आहे. गहू, मका, कांदा याचे मोठे नुकसान झाले आहे.

अधिक माहिती अशी, तालुक्यातील पाचेगाव, पुनतगाव आदी भागात सोसाट्याच्या वार्‍यासह रिमझिम पावसाने हजेरी लावली.

यामुळे काढणीला आलेला कांदा , गहू पीकासह जनावरांसाठी लागणारा मका कडवळ आदी चारा पीकांचे नुकसान झाले. यातच अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे ऊस तोडणी कामगारांच्या राहत्या कोप्यात पाणी शिरून जीवनोपयोगी वस्तू बरोबर धान्य देखील भिजले आहे.

त्यात त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काढणीला आलेला कांदा व गहू भिजून शेतकर्‍यांच्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

तातडीने नुकसान क्षेत्र पाहणी करून प्रशासनाने तातडीने पंचनामे करण्याचे आदेश देऊन शेतकर्‍यांना नुकसान भरपाई देण्याचा प्रयत्न करावा.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe