अहमदनगर Live24 टीम, 25 नोव्हेंबर 2020 :- निमगाव वाघा (ता. नगर) येथे नव्याने सुरु होणार्या धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाच्या फलकाचे अनावरण ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या प्रमुख उपस्थितीत राळेगण सिध्दी येथे झाले.
यावेळी वाचनालयाचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते पै. नाना डोंगरे, वृक्षमित्र तथा निसर्ग व सामाजिक पर्यावरण मंडळाचे राज्य अध्यक्ष आबासाहेब मोरे, चिपळूण येथील वरिष्ठ कार्याध्यक्ष विलास महाडिक, राज्य सचिव धीरज वाटेकर, सल्लागार डॉ. महेंद्र घागरे, मारुती कदम, राजाराम ढवळे आदी उपस्थित होते.
निमगाव वाघातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची सोय होण्यासाठी धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालय सुरु करण्यास पै. नाना डोंगरे यांनी पुढाकार घेतला असून, नुकतीच वाचनालयास मान्यता मिळाली आहे.
या वाचनालयाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण होण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहे. तसेच ग्रामीण विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेसंदर्भात मार्गदर्शन केले जाणार आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी वाचनालयाच्या पुढील वाटचालीश शुभेच्छा दिल्या.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved