जिल्ह्यात आज १२ केंद्रावर लसीकरण होणार

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 16 जानेवारी 2021 :-कोरोना लसीकरण मोहिमेसाठी जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे. केंद्र आणि राज्य शासन आणि आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या निर्देशानुसार शनिवार, १६ जानेवारी रोजी ही मोहिम राबविण्यात येणार आहे.

जिल्ह्यात एकूण १२ केंद्रांवर पहिल्या टप्प्यात ही मोहिम राबविण्यात येणार असून यात जिल्हा सामान्य रुग्णालय, जिल्ह्यातील आठ ग्रामीण रुग्णालये आणि महानगरपालिका क्षेत्रातील ४ नागरी आरोग्य केंद्रांचा समावेश आहे.

पुण्याहून लसीचे डोस योग्य नगर येथे आणण्यात आले. तेथून जिल्हा परिषद येथे त्याची साठवणूक करण्यात येऊन दिनांक १४ रोजी या लसीचे वितरण संबंधित लसीकरण केंद्रांना करण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा,

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे आणि महानगरपालिका आरो्ग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांनी दिली. दिनांक १६ जानेवारी रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयासह उपजिल्हा रुग्णालय पाथर्डी, उपजिल्हा रुग्णालय कर्जत,

शेवगाव ग्रामीण रुग्णालय, श्रीरामपूर ग्रामीण रुग्णालय, राहाता ग्रामीण रुग्णालय, संगमनेर ग्रामीण रुग्णालय, अकोले ग्रामीण रुग्णालय येथे लसीकरण मोहिम राबविण्यात येणार आहे.

याचबरोबर, महानगरपालिका क्षेत्रातील तोफखाना नागरी आरोग्य केंद्र, जिजामाता नागरी आरोग्य केंद्र, केडगाव नागरी आरोग्य केंद्र आणि नागापूर नागरी आरोग्य केंद्र येथे ही मोहिम राबविण्यात येणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment