धरणे भरले तरीही या ठिकाणी पाण्याचा तुटवडा

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,11 सप्टेंबर 2020 :- जिल्ह्यात सर्वत्र चांगला पाऊस झाल्याने जिल्ह्यातील धरणांच्या पाण्याच्या पातळीत चांगली वाढ झाली आहे. पाण्याची पातळी उंचावली असून देखील जिल्ह्यातील या तालुक्यात पाण्याचा तुटवडा भासतो आहे.

कोपरगाव तालुक्यातील चारही साठवण तलावात पाणी शिल्लक असताना शहराला मात्र ऐन पावसाळ्यातदेखील आठवड्यातून एकदाच पाणी मिळत आहे.

पावसाळ्यात पालिकेने नागरिकांना किमान दोन दिवसाआड पाणी पुरवठा करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. शहराला कायम पाच ते सात दिवसाआड पाणी पुरवठा केला जातो.

यावर्षी सर्वत्र पावसाचे प्रमाण चांगले असून उर्ध्व गोदावरी खोऱ्यातील धरण आणि जायकवाडी देखील भरली आहे. मात्र अजून ही शहरवासीयांच्या हालपेष्टा संपल्या नाही.

अजून ही आठवड्यातून एकदाच नळाला पाणी येते. त्यावर ही कोणी बोलण्यास तयार नसून सर्वत्र शुकशुकाट आहे. कुठलीही बैठक, निर्णय, कोणतेही नियोजन नाही.

कोपरगाव नगरपालिका येथील पाणी पुरवठा विभागातील अभियंता ऋतुजा पाटील म्हणाले, पाटबंधारे विभागाकडून पुढील पाण्याचे आवर्तन कधी मिळणार यावरून शहराचे आवर्तन किती दिवसाआड हे ठरत असते.

अजून तरी पाण्याचे दिवस कमी करण्याबाबत निर्णय झालेला नाही. शहरातील बोगस नळधारकांविरुद्ध स्टिंग ऑपरेशन राबविण्यात येणार असून त्याबाबत सर्व्हेक्षण सुरु आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment