अहमदनगर Live24 टीम, 02 डिसेंबर 2020 :-नगर तालुक्यातील कापूरवाडी परिसरात बिबट्या विहिरीत पडला असल्याची व्हिडीओ क्लिप सोमवारी दुपारी व्हॉटस् अॅप ग्रूपवर व्हायरल झाली.
मात्र, ही क्लिप कापूरवाडी भागातील नसून कुणीतरी खोडसाळपणा करून ती व्हायरल केली असल्याचे वन परिक्षेत्र अधिकारी सुनील थेटे व निसर्गमित्र मंदार साबळे यांनी सांगितले.

सध्या नगर तालुक्याच्या विविध भागात बिबट्याचे दर्शन होत असल्याने आधीच नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. कुणीही अतिउत्साहाच्या भरात ठावठिकाणा माहिती नसलेल्या वन्यप्राण्यांच्या क्लिप व्हायरल करू नये, असे आवाहन त्यांनी केले.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved