विखे पाटील म्हणाले … ‘तुझं माझं जमेना, तुझ्यावाचून करमेना’ अशी या सरकारची अवस्था

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 13 मार्च 2021:- सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये नेहमीच विविध मुद्द्यांवरून आरोप – प्रत्यारोप तसेच टीकेचा भडीमार केला जात असतो. यातच भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपल्याच शब्दात राज्यातील ठाकरे सरकारचा खरपूस समाचार घेतला आहे.

महाआघाडी सरकारमध्ये भ्रष्टाचाराने कळस केला असून हे सरकार सर्वच आघाडींवर अपयशी ठरले आहे. ‘तुझं माझं जमेना, तुझ्यावाचून करमेना’ अशी या सरकारची अवस्था झाली असल्याची टीका त्यांनी केली.

तसेच आगामी निवडणुकांबाबत विखे म्हणाले कि, आगामी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभुमीवर पुढील आठवड्यात श्रीरामपुरात वॉर्डनिहाय बैठका घेऊन कार्यकर्त्यांची क्षमता पाहुन त्यांना कामाचे आदेश दिले जातील.

आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका भाजपाच्या चिन्हावर तर सहकारी संस्थांच्या निवडणुकीबाबत पुढील महिन्यात बैठक घेऊन कुणाशी युती करायची याबाबत निर्णय घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

व्यक्तीद्वेषाच्या राजकारणाने मनोरंजन होते, परंतु संघटनेची बांधणी होणार नाही. तरुण महिला व बेरोजगार यांना बरोबर घेऊन त्यांच्यात आशावाद निर्माण करावा लागेल.

पुढील काळातील जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका भाजपा म्हणून लढवायच्या आहेत. सहकारी संस्थांच्या निवडणुकांसाठी पुढील महिन्यात गट व गावनिहाय बैठका घेऊन युतीबाबत योग्य वेळ आल्यावर निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe