Sujay Vikhe : केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या मंत्री समितीच्या बैठकीत कांदा निर्यात बंदी उठवण्यात आलेली आहे. केंद्र सरकारच्या निर्णयाचे खा.सुजय विखे यांनी आभार मानले आहेत.
त्याचबरोबर मंत्री राधाकृष्ण विखे आणि खासदार सुजय विखे यांनी केलेल्या प्रयत्नामुळे कांदा निर्यात बंदी केंद्र सरकारने उठवली या अनुषंगाने आज शेतकऱ्यांच्या वतीने नगर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांच्या वतीने खासदार सुजय विखे यांचा यांचे आभार मानत त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कांदा निर्यातबंदी उठवल्यामुळे महाराष्ट्र आणि देशातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. महाराष्ट्र मध्ये सर्वाधिक कांदा उत्पादन होत असताना विशेष करून नगर नाशिक पुणे जिल्ह्यातील शेतकरी कांदानिर्यात बंदी निर्णयामुळे हवाल दिल झाले होते.
या पार्श्वभूमीवर खासदार सुजय विखे त्याचबरोबर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांनी सातत्याने केंद्र सरकारकडे विशेष करून केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करत कांदा निर्यात बंदी उठवण्यासाठी प्रयत्न केले.
या अनुषंगाने काल दिल्लीमध्ये झालेल्या मंत्री समितीच्या बैठकीमध्ये अमित शहा यांनी तीन लाख मॅट्रिक टन कांद्याला निर्यात परवानगी दिलेली आहे. या निर्णयामुळे राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
जवळपास 50 हजार टन कांदा एकट्या बांगलादेश साठी भारतातून निर्यात होण्यासाठी ही परवानगी देण्यात आलेली आहे. या पार्श्वभूमीवर खासदार सुजय विखे त्याचबरोबर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांनी दिल्ली सरकारकडे वारंवार केलेल्या पाठपुराव्यानंतर केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदीचा निर्णय उठवलेला आहे.
या अनुषंगाने आज नगर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांच्या वतीने खासदार सुजय विखे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी माजी मंत्री शिवाजी कर्डिले, भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अक्षय कर्डिले, भाऊसाहेब बोठे, हरिभाऊ कर्डिले, सुरेश सुंबे, निखिल वारे, बाळासाहेब पवार , धर्माजी आव्हाड आदी उपस्थित होते.
यावेळेस बोलताना खासदार सुजय विखे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस अजित पवार यांच्या माध्यमातून वारंवार केंद्रीय मंत्री अमित शहा यांची भेट घेत राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी मांडण्यात आल्या. विशेष करून नगर नाशिक पुणे पट्ट्यातील कांदा उत्पादन मोठ्या प्रमाणात असल्याने कांदा निर्यात बंदीचा फटका बसत असल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा देणे गरजेचे असल्याची भूमिका या भागाचा खासदार म्हणून आपण मांडली.
त्याचबरोबर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांनीही शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेत तातडीने निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते. मोदी गॅरेंटी यानुसार केंद्र सरकारने निर्णय घेतला असून कांदा निर्यात बंदी उठवण्यात आलेली आहे. हा एक प्रकारे नगर जिल्ह्यासह महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या संघर्षाचा विजय असल्याचे प्रतिपादन खासदार विखे यांनी केले.
यावेळी त्यांनी विरोधकांचे नाव न घेता अनेक जण केवळ फोटो काढण्या पुरते मागण्याचे निवेदन देतात. मात्र विखे कुटुंबाने जी ही आश्वासने दिलेली आहेत ती फोटोसेशन न करता पूर्ण केल्याचं खासदार विखे म्हणाले. दूध अनुदान, कांदा अनुदान, शहरातील उड्डाणपूल, बायपास आदी प्रश्न आम्ही कोणताही गाजावाजा न करता नागरिकांसाठी पूर्ण केलेले आहेत.
त्यामुळे नागरिकांनीही उमेदवार कोण, त्याचे शिक्षण किती, त्याची कार्यक्षमता किती, त्याचं केंद्र सरकारमध्ये असलेलं वजन किती, त्याच्या कुटुंबाचे राजकारण आणि समाजकारणाचे योगदान किती, त्यांनी केलेली कामे, त्यांची समाजाची असलेली नाळ या सर्व गोष्टींचा विचार केला पाहिजे असे आवाहन केले. ज्या पद्धतीने आम्ही प्रश्नांची मांडणी सरकारकडे केली आणि त्यामुळे हे प्रश्न सुटलेले आहेत ही गोष्ट महत्त्वाची आहे. मतदारांनी ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे असा आवर्जून खासदार सुजय विखे यांनी नमूद केले.
माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी आपल्या भाषणात मोदी सरकारमुळे आपल्याला आता पुन्हा एकदा तिसऱ्यांदा दिवाळी साजरी करण्याची पर्वणी मिळाली आहे असे वक्तव्य केले. अनेक जण टीका करायची म्हणून काहीही टीका करत असले तरी दिलेले आश्वासन पाळणे ही विखे कुटुंबाची ओळख असल्याचं कर्डिले यावेळी म्हणाले.