कलेतून नवनिर्मितीचा आनंद – विक्रम राठोड

Published on -

नगर –  शिक्षणातील जीवघेण्या स्पर्धेत कला लुप्त पावत असतांना चित्रकला स्पर्धेतून निर्माण होणारा नवनिर्मितीचा आनंदबालकांचे जीवन समृद्ध करणारा असल्याचे प्रतिपादन जिल्हा वाचनालयाचे कार्यवाह विक्रम राठोड यांनी केले.  स्वातंत्र्य दिनाचेऔचित्य साधून आयोजित शालेय चित्रकला स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ते बेालत होते.

अहमदनगर जिल्हा वाचनालयाच्या वतीने  आयोजित  शालेय  चित्रकला  स्पर्धेस  मोठा  प्रतिसाद  मिळाला. बाई इचरजबाई प्रशालेतदोन गटात झालेल्या स्पर्धेत सुमारे 630 बालके चित्र साकारण्यात रमुन गेले. 

स्पर्धेचे उद्घाटन कार्यवाह विक्रम राठोड व उपाध्यक्षअजित रेखी, शिल्पा रसाळ यांच्या हस्ते झाले. यावेळी संचालक किरण आगरवाल, दिलीप पांढरे, राहुल तांबोळी, गणेश अष्टेकर,परिक्षक अशोक डोळसे, कवी चंद्रकांत पालवे, माजी ग्रंथपाल संजय लिहिणे, ग्रंथपाल अमोल इथापे, नितीन भारताल, पल्लवीकुक्कडवाल व कर्मचारी उपस्थित होते.

   

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe