अहमदनगर Live24 टीम, 30 जानेवारी 2021 :-श्रीगोंदा तालुक्यातील देवदैठण येथे योगेश्वर शेतकरी संघाचे संस्थापक विलास वाघमारे यांनी आण्णा हजारेंना पाठींबा देण्यासाठी प्रजासत्ताक दिनापासून सुरू केलेले उपोषण पाचव्या दिवशी मागे घेण्यात आले .
दोन वर्षापूर्वी पद्मभूषण आण्णा हजारे आमरण उपोषण केले होते . सरकारने स्वामीनाथन आयोग लागू करू असे लेखी आश्वासन दिले होते .परंतू त्याची कार्यवाही सरकार करू शकले नव्हते . त्यामूळे आण्णा हजारे ३० जानेवारी पासून केंद्र सरकारच्या विरोधात शेतकरी हितासाठी उपोषण करणार होते .

सरकारने आण्णांना दिलेल्या आश्वासनाची अंमलबजावणी करावी , त्यांना या वयात उपोषणाची वेळ येऊ नये , देशासाठी महत्वाचे व्यक्ती अण्णा आहेत म्हणून आण्णांच्या उपोषणापूर्वी केंद्र सरकारचे या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी विलास वाघमारे उपोषणास बसले होते .
केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलास चौधरी , माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागण्यांसंदर्भात केंद्रात एक समिती नेमणार असल्याचे आश्वासन दिल्याने अण्णा हजारेंनी उपोषण स्थगित केले .
त्यानंतर शनिवारी अण्णा हजारे यांच्या सांगण्यावरुन विलास वाघमारे यांनी बेलवंडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरविंद माने व जेष्ठ नागरीक रामभाऊ कौठाळे यांच्या हस्ते लिंबू पाणी घेऊन उपोषण सोडले . यावेळी माजी पोलीस अधिकारी बाळासाहेब बनकर ,उद्योजक वसंत बनकर , निलेश गायकवाड ,
डॉ . सचिन पडवळ ,मेजर संजय कौठाळे, कांतीलाल गुंजाळ , संतोष बनकर , अरूण कौठाळे , रविंद्र बनकर व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते . फोटो ओळी : विलास वाघमारे यांनी बेलवंडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरविंद माने व जेष्ठ नागरीक रामभाऊ कौठाळे यांच्या हस्ते लिंबू पाणी घेऊन उपोषण सोडले .
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, all rights reserved