अहमदनगर Live24 टीम, 15 जानेवारी 2021 :-नगर तालुक्यातील डोंगरगण येथे अर्धांगवायूचा झटका आलेल्या मातोश्रींना मतदान केंद्रावर घेऊन जात असताना, कोणतीही विचारपूस न करता एमआयडीसी पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक मोहन बोरसे यांनी मुख्याध्यापकास बेदम मारहाण केली.
या प्रकाराने संतप्त झालेले गावकरी एकत्र येत बोरसे यांच्या अन्यायाच्या विरोधाती मतदान प्रक्रियेवर तब्बल दोन तास बहिष्कार टाकला. त्यामुळे महसूल यंत्रणाही खडबडून जागी झाली. बराच वेळ मतदान प्रक्रिया बंद होती. प्रांताधिकार्यांनी घटनास्थळी धाव घेऊन वातावरण शांत केले.
त्यानंतर मतदान प्रक्रिया शांततेत सुरू झाले. नगर तालुक्यातील डोंगरगण ग्रामपंचायतीसाठी शुक्रवारी मतदान प्रक्रिया सुरळीत चालू होती. त्यावेळी बोरसे साहेब हे पोलीस फौजफाट्यासह दाखल झाले. त्याचवेळी मतदान केंद्राच्या परिसरात असणार्या वाहनांवरून गावकर्यांशी चकमक झाली.
त्याचवेळी गणपतराव मते पाटील विद्यालयाचे मुख्याध्यापक अजय भूतकर हे आपल्या मातोश्रींना घेऊन मतदान करण्यासाठी चालले होते. त्यांच्या मातोश्रींना अर्धांगवायूचा आजार असल्याने मतदान केंद्रापर्यंत वहानात घेवून जावे अशी परवानगी संबंधित पोलीस कर्मचार्यांकडून घेतली होती.
व तशी सवलतही निवडणूक आयोगाने दिली आहे. असे असतानाही बोरसे साहेबांनी मुख्याध्यापक भूतकर यांना अरेरावी व शिवीगाळ करत बेदम मारहाण केली.
तसेच त्यांच्या पत्नीसही धक्काबुक्की केल्याचे भूतकर यांनी सांगितले. या प्रकाराने संतप्त गावकऱ्यांनी मतदान प्रक्रियेवर तब्बल दोन तास बहिष्कार टाकला. त्यामुळे महसूल यंत्रणाही खडबडून जागी झाली. बराच वेळ मतदान प्रक्रिया बंद होती. प्रांताधिकार्यांनी घटनास्थळी धाव घेऊन वातावरण शांत केले.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, all rights reserved