अहमदनगर Live24 टीम, 27 सप्टेंबर 2021 :- केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या नागरी सेवा परिक्षेत देशपातळीवर 37 आणि महाराष्ट्र राज्यातून दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विनायक नरवडे यांनी नुकतीच जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांच्याकडून नागरी सेवा कार्यपध्दती आणि जबाबदारी यासंदर्भात मार्गदर्शन घेतले.
यावेळी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी विनायक नरवडे यांना लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत मिळवेल्या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन केले. यावेळी विनायक नरवडे यांनी जिल्हाधिकारी यांच्याशी संवाद साधला.
तसेच त्यांच्याकडून नागरी सेवेतील जबाबदाऱ्या, सेवा नियम आणि अन्य विषयांवर मार्गदर्शन घेतले. विनायक नरवडे यांच्या यशामुळे जिल्हातील युवकांना प्रोत्साहन मिळेल आणि ते स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करण्यास प्राधान्य देतील असा विश्वास यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेण्यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न होत आहेत. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या तयारीसाठी प्रशिक्षण देणाऱ्या अनेक संस्था राज्यात कार्यरत आहेत.
राज्य शासनासह स्थानिक स्वराज्य संस्था, विद्यापीठे यांच्या अखत्यारीत या प्रशिक्षण संस्था व केंद्रे सुरू आहेत. याचा तरुणांनी लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी यांनी यावेळी केले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम