अहमदनगर Live24 टीम, 15 जानेवारी 2021 :-गेल्या अनेक दिवसांपासून जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीचे वारे वाहत होते. अखेर आज मतदान होणार आहे. दरम्यान यापूर्वी संगमनेर तालुक्यात एक गैरप्रकार उघडकीस आला आहे.
संगमनेर तालुक्यातील कुरण गामपंचायतीच्या निवडणुकीत शेतकरी विकास मंडळ व शेतकरी परिवर्तन आघाडी असे दोन पॅनल आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीचा प्रचार १३ जानेवारीला संपला.
निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दोन्ही पॅनलला प्रचार बंद करण्याची वेळ, मर्यादा ठरवून दिली होती. असे असताना शेतकरी विकास मंडळाचे सर्व कार्यकर्ते व उमेदवारांनी आचारसंहितेचा भंग करून त्यांची प्रचार सभा व रॅली सुरू ठेवली.
याबाबत ग्रामपंचायतीच्या तसेच गावातील इतरही नागरिकांच्या सीसीटीव्हीमध्ये चित्रीकरण झाले आहे. १३ जानेवारीला सकाळी ११ ते दुपारी २. ३० ही वेळ प्रचार, रॅलीसाठी दिली असताना त्यानंतर दुपारी तीन ते साडेतीनपर्यंत शेतकरी विकास मंडळाचा प्रचार व रॅली सुरू होती.
शेतकरी विकास मंडळाचे कार्यकर्ते व उमेदवारांनी आचारसंहितेचा भंग करून गंभीर स्वरूपाचा गुन्हा केला असून त्यांच्यावर कायेदशीर कार्यवाही करावी, असे तक्रार अर्जात म्हटले असून त्यावर तक्रारदार शेख यांचे नाव व सही आहे.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, all rights reserved