हॉटेल सुरू ठेवून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 ,1 मे 2020 :- जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाचे उल्लंघन करत नाशिक-शिर्डी रोडवर असलेल्या सावळिविहीर फाट्याजवळील हॉटेलवर शिर्डी पोलिसांनी छापा टाकला. याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे.

याबाबत शिर्डी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, दि. २९ रोजी दुपारी पावणेदोन वाजेच्या सुमारास शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी यांना शिर्डी नाशिक रोडवर सावळिविहीर फाटा येथे हॉटेल वेल लक व एसार आर रिसॉर्ट येथे काही मुले व मुली थांबलेले आहेत,

अशी माहिती मिळाली. तीवरून त्यांनी पोलीस निरीक्षक गौकूळ औताडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथून घुगे, हवालदार साळवे, अंधारे, राजगिरे यांना तेथे पाठविले. या पथकास तेथे एक पुरुष व एक महिला मिळून आले.

हॉटेलचा मॅनेजर रामहरी जानराव काळे याने त्यांची रजिस्टरवर नोंद न केल्याचे आढळुन आले. यावरून शिर्डी पोलीस स्टेशनचे अजय अंधारे यांच्या फिर्यादीवरुन मोसिन मोहम्मद सैय्यद (वय २९, रा. गांधीनगर, कोपरगाव) रामहरी जानराव काळे

(वय २९, रा. टाकळी, ता. शेगाव, जि. बुलढाणा, सध्या रा. के.के. मिल्क, हॉटेल वेलकम व एसार आर रेसॉर्ट, सावळिविहीर फाटा) यांच्या विरोधात भा.दं.वि. कलम १८८ (२), २६९, २७१ व साथरोग प्रतिबंध कायदा १८९७चे कलम २, ३, ४ प्रमाणे तसेच आपत्ती व्यवस्थापन अधीनियम २००५चे कलम ५१ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com® 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe