अहमदनगर Live24 टीम,22 सप्टेंबर 2020 :- श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर येथील विसापूर धरण पूर्ण क्षमतेने भरले. दक्षिण नगर साठी हे धरण म्हणजे अमृतवाहिनीच आहे. मोठ्या संख्येने पर्यटक येथे आकर्षित होतात.
परंतु यंदा कोरोनामुळे हा भाग गजबजणार नाही. आमदार बबनराव पाचपुते यांच्या हस्ते या धरणाचे जलपूजन करण्यात आले. हे धारण भरल्याने शेतकरी आणि नागरिकांत आनंदाचे वातावरण पसरले आहे.
सध्या अहमदनगर जिल्ह्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावली आहे. सततच्या होणाऱ्या जोरदार पावसाने कुकडीच्या धरणातील अतिरिक्त पाणी विसापूर तलावात सोडण्यात आले आहे.
हा तलाव भरल्यामुळे या तलावाखालील गावांना उन्हाळ्यात फायदा होणार आहे. या तलावाखाली मोठ्या प्रमाणात शेती आहे.
त्यामुळे या भागात ऊस हे महत्वाचे पीक येत असून या पाण्याचा या भागातील शेतीला नक्कीच फायदा होणार आहे. तसेच नगर तालुक्यातील घोसपुरी पाणी योजनेशी फायदा होईल.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved