अहमदनगर Live24 टीम, 16 जानेवारी 2021 :-जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी शुक्रवारी मतदान प्रक्रिया पार पडली होती. गावाकडील मतदान असल्याने गावाबाहेर गेलेली मंडळी देखील मतदानासाठी गावाकडे परतली होती.
या दरम्यानच असाच एक जण मतदानासाठी आला त्याने मतदान केले आणि पोलिसानी त्याला थेट तुरुंगात धाडले. याबाबत सविस्तर माहिती अशी कि,
जामखेड ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने तालुक्यातील खांडवी या ठिकाणी फरार आसलेला आरोपी हा मतदान करण्यासाठी आला होता. मात्र याची गुप्त माहिती पोलीसांना मिळाली आन त्याला लगेच अटक करण्यात आली.
शरद गुलबाशा भोसले रा.खांडवी ता.जामखेड असे फरार झालेल्या आरोपीचे नाव आहे. काल दि १५ जानेवारी रोजी ग्रामपंचायत निवडणुकीची मतदान प्रक्रिया होती.
याच मतदानाच्या अनुशंगाने आरोपी भोसले हा खांडवी या ठिकाणी मतदान करण्यासाठी येणार आसल्याची गुप्त माहिती जामखेड पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांना मिळाली.
त्यांनी लगेच खांडवी बुथवर ड्युटी करणाऱ्या पोलीस पथकाला कळविले. त्या अनुषंगाने पोलीसांनी त्याच्यावर पाळत ठेवली होती. तो मतदान केंद्रात जावुन मतदान करून बाहेर आल्यानंतर
त्याला काही समजायच्या आत त्याचेवर झडप घालुन जागीच पकडण्यात आले. आरोपी भोसलेवर या अगोदर जामखेड पोलीस स्टेशनला गंभीर गुन्हे दाखल असुन तो जामिनावर सुटलेला होता.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, all rights reserved