ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 1 डिसेंबर 2020 :-राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार श्रीरामपूर तालुक्यातील जुलै ते डिसेंबर या कालावधीत मुदत संपणाऱ्या तालुक्यातील २७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा मतदार यादी कार्यक्रम २० नोव्हेंबर रोजी जाहीर करण्यात आला असल्याची माहिती प्रांताधिकारी अनिल पवार व तहसीलदार प्रशांत पाटील यांनी दिली.

श्रीरामपूर तालुक्यातील १५ ग्रामपंचायतींची सदस्य मंडळाची मुदत ऑगस्टमध्ये संपत आहे. त्यामध्ये बेलापूर – प्रभाग ६ व सदस्य संख्या – १७, मुठेवडगाव – प्रभाग ३ व सदस्य – ९, खानापूर – प्रभाग ३ व सदस्य – ९, खोकर – प्रभाग ४ व सदस्य ११, वडाळा महादेव प्रभाग ५ व सदस्य – १५, मातापूर – प्रभाग ३ व सदस्य – ९,

महांकाळ वाडगाव – प्रभाग ३ व सदस्य – ९, नायगाव – प्रभाग ३ व सदस्य – ९, टाकळीभान – प्रभाग ६ व सदस्य-१७, भेर्डापूर – प्रभाग ४ व सदस्य-११, वळदगाव – प्रभाग ३, सदस्य – ९, मालुंजा बुद्रूक – प्रभाग ४, सदस्य ११, गळनिंब – प्रभाग ३, सदस्य ९, बेलापूर खुर्द – प्रभाग ५, सदस्य १३, पढेगाव – प्रभाग ५, सदस्य – १५,

तर तालुक्यातील १२ ग्रामपंचायतींच्या सदस्य मंडळाची मुदत सप्टेंबरमध्ये संपत आहे. त्यामध्ये मातुलठाण प्रभाग ३, सदस्य ७, घुमनदेव प्रभाग ३, सदस्य – ७, गोंडेगाव – प्रभाग ४, सदस्य – ११, कारेगाव – प्रभाग ५, सदस्य – ११, निपाणी वाडगाव-प्रभाग ६, सदस्य – १७, सराला – प्रभाग ३, सदस्य ७, गोवर्धनपूर- प्रभाग ३, सदस्य ७,

एकलहरे- प्रभाग ३, सदस्य ९, लाडगाव – प्रभाग ३, सदस्य ७, कुरणपूर – प्रभाग ३, सदस्य -७, ब्राह्मणगाव वेताळ – प्रभाग ३, सदस्य ७, मांडवे- प्रभाग ३, सदस्य – ९ अशी प्रभागनिहाय सदस्य संख्या आहे. या २७ ग्रामपंचायतींच्या प्रभागनिहाय प्रारूप मतदारयाद्या यापूर्वी प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.

अंतिम प्रभाग रचना २५ सप्टेंबरला प्रसिद्ध करण्यात आलेल्या विधानसभा मतदार यादीनुसार मंगळवारी, १ डिसेंबर रोजी सर्व तलाठी कार्यालय, मंडळ अधिकारी कार्यालय, ग्रामपंचायत कार्यालय, पंचायत समिती कार्यालय व तहसील कार्यालय येथील सूचना फलकांवर प्रसिद्ध करण्यात येणार आहेत, अशी माहिती दिली आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment