मतदारांनी भाजपला नाकारले; मुंडेंच्या पॅनलचा पराभव

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 18 जानेवारी 2021 :-  जिल्ह्यात आज मतमोजणी प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीमध्ये अनेक दिग्ग्जना पराभवाचा सामना करावा लागल्याचे चित्र दिसून आले.

नुकतेच ग्रामपंचायत निवडणुकीत पिंगेवाडी भाजप जिल्हाध्यक्ष अरूण मुंढे यांच्या पॅनलचा धुव्वा उडाला आहे. सावली दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष चाँद शेख,

अशोक तानावडे तसेच नंदू मुंढे यांच्या संत ज्ञानेश्वर व संत भगवानबाबा ग्रामविकास पॅनलचे सर्वच ९ उमेदवार बहुमताने विजयी झाले.

मतदारांनी भाजपा जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे यांच्या पॅनलचा धुव्वा उडवत सुपडे साफ केले. पिंगेवाडी मधील निवडणूक ही युवकांनी हातात घेऊन दाखवून दिले युवकांनी निवडणूक हातात घेतल्यावर काय होत असते.

दरम्यान या निकालावरून असे दिसून आले कि जनतेने स्पष्टपणे भाजपाला नाकारले आहे. दरम्यान मुंडे गटाचा हा मोठा पराभव मानला जात असल्याचे सांगितले जात आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment