Ahilyanagar News:-आपल्याला माहित आहे की जेव्हा ही मतदान असते तेव्हा त्या दिवशी प्रत्येक मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा बऱ्याचदा आपल्याला सकाळपासून दिसून येतात व त्यानंतर जास्त मतदान केंद्रांवर गर्दी ही दुपारी तीन नंतर पाहायला मिळते. साधारणपणे ही परिस्थिती आपल्याला सगळ्या ठिकाणी दिसून येते.
परंतु बऱ्याचदा दुपारच्या कालावधीमध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणावर मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा लागलेल्या असतात व यावेळी मात्र रांगेत उभे राहण्याशिवाय पर्याय नसतो व कित्येक वेळा आपल्याला रांगेत ताटकळत उभे राहावे लागते. हा अनुभव आपल्यापैकी बऱ्याच जणांना आला असेल.
परंतु आता अहिल्यानगर जिल्ह्यातील मतदारांना मात्र मतदान करताना अधिक वेळ रांगेत उभे राहावे लागणार नाही व याकरिता जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या संकल्पनेतून जिल्हा निवडणूक प्रशासनाच्या माध्यमातून मतदार प्रतीक्षा व्यवस्थापन प्रणाली विकसित करण्यात येणार असून या प्रणालीच्या माध्यमातून मतदान केंद्रावरील रांगेत उभे असलेल्या मतदारांची संख्या आता कळु शकणार आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातील मतदारांना मतदान केंद्रावर रांगेत उभे राहण्यापासून मिळेल मुक्ती
याबाबत सविस्तर वृत्त असे की, अहिल्यानगर जिल्ह्यातील मतदारांना मतदान करताना अधिक वेळ रांगेमध्ये उभे राहावे लागू नये याकरिता जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या संकल्पनेतून जिल्हा निवडणूक प्रशासनाच्या माध्यमातून विकसित करण्यात आलेल्या मतदार प्रतीक्षा व्यवस्थापन प्रणाली द्वारे मतदान केंद्रावरील रांगेत उभे असलेल्या मतदारांची संख्या आता कळू शकणार आहे.
आपल्याला माहित आहे की अनेकदा मतदान केंद्रावर गर्दी असल्यामुळे मतदार अधिक वेळ रांगेत उभे न राहता मतदान न करता परत फिरून जातात व याचा नक्कीच विपरीत परिणाम एकूण मतदानाच्या टक्केवारीवर होतो.
याकरिता आता मतदान केंद्रावरील रांगेची स्थिती मतदारांना कळायला हवी ही कल्पना जिल्हाधिकारी सालीमठ यांनी आढावा बैठकीमध्ये मांडली आणि त्यासाठी प्रणाली विकसित करण्याची सूचना केल्या आहेत.
त्यामुळे आता त्या दृष्टीने जिल्हा निवडणूक प्रशासनाने व्हीक्यूएमएस प्रणाली विकसित केली असून मतदान केंद्रावर रांगेत उभे असलेल्या मतदारांची संख्या विशिष्ट कालावधीत मतदान केंद्रावरील कर्मचारी या प्रणालीत रांगेत उभे असलेल्या मतदारांची संख्या अपडेट करतील व नागरिकांना दिलेल्या लिंक वर जाऊन जिल्ह्यातील कोणत्याही मतदान केंद्रावरील रांगेची स्थिती जाणून घेता येणार आहे.
त्यामध्ये त्यांना प्रथम मतदारसंघ आणि मतदान केंद्र निवडून प्रतीक्षा कालावधी माहीत करून घेता येईल आणि सोयीच्या वेळी मतदान करता येणार आहे.
मतदारांनी आता या सिस्टमचा उपयोग करून सहजपणे मतदान करावे आणि जिल्ह्यात 75 टक्के मतदानाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी सालीमठ यांच्या माध्यमातून करण्यात आलेले आहे.