व्हीआरडीई ‘त्या’ चर्चांना मिळणार पूर्णविराम खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांची माहिती

अहमदनगर Live24 टीम, 11 जानेवारी 2021 :-येथील व्‍हीआरडीई स्‍थलांतरीत करण्‍याचा केंद्र सरकारचा कोणताही विचार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या  नेतृत्‍वाखाली आत्‍मनिभर भारत योजनेतून या संस्‍थेचे अधिक मजबुतीकरण करण्‍याची ग्‍वाही व्‍हीआरडीईच्‍या पदाधिका-यांनी दिल्‍याने गेल्‍या दोन दिवसांपासुन सुरु झालेल्‍या या चर्चेला आता पुर्णविराम मिळाला असल्‍याचे खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी सांगितले.

अहमदनगर येथील व्‍हीआरडीई संस्‍था स्‍थलांतराच्‍या संदर्भात मागील दोन दिवसांपासुन सुरु झालेल्‍या विषयाच्‍या पार्श्‍वभूमिवर खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी दिल्‍लीत व्‍हीआरडीईचे चेअरमन यांचे

तांत्रिक सल्‍लागार संजिव कुमार यांच्‍यासह तसेच संरक्षण विभागाच्‍या वरिष्‍ठ आधिका-यांची भेट घेवून अहमदनगर येथील संस्‍था हलविण्‍याच्‍या संदर्भात शहनि‍शा केली. त्‍यानंतर त्‍यांनी या भेटी संदर्भात माध्‍यमांना माहीती दिली.