Ahmednagar News : फिरायला कुणला आवडत नाही. पर्यटनाची हौस ही सर्वानाच असते. अनेक हौशी लोक पर्यटनासाठी विविध ठिकाणी जात असतात. अनेकांना परराज्यातील पर्यटन स्थळे आकृष्ट करत असतात.
परंतु तुम्हाला माहित आहे का की अहमदनगर जिल्ह्यातच अनेक पर्यटन स्थळे आहेत. या स्थळांकडे पाहिल्यावर जगात भारी नगरची पर्यटन स्थळे अशीच काहीसे तोंडातून बाहेर पडतात.
सर्वांनाच मोहित करणारी ही स्थळे आहेत अकोले तालुक्यातील. पर्यटनाची पंढरी म्हणून पर्यटनाकडे पाहिले जाते. धो-धो पाऊस आणि असंख्य धबधबे हे अकोले तालुक्याचे वैशिष्ट्य.
भंडारदरा धरण पाणलोटातील ४० किलोमीटरचा रिंग रोड परिसरातील मुतखेल वावडीच्या डोंगरावरून आकाशाकडे झेपावणारे उड़ते धबधबे,
कोलटेभे येथील गायमुख, वसुंधरा, नेकलेस फॉल, कातळशिल्प अमृतेश्वर मंदिर, रतनगड, साम्रदची अशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाची गूढरम्य सांधनदरी, गिरणाई धबधबा, घाटघर कोकणकडा, वाघाचे तळे, घाटनदेवी टेबल लॅन्ड, कळसूबाई शिखर, पाबरगड, राज्यात भूगोलाच्या पुस्तकात दिमाखात झळकणारा बहुचर्चित रंधा धबधबा
तसेच हरिश्चंद्रगड दुधनी धबधबे, कोकणकडा, केदारेश्वर धबधबा, कुमशेत धारेराव जंगल, आंबित धरण, भैरवनाथगड, कुंजीरगड, कोंबडकिल्ला फोफसंडी परिसरातील धबधबे, विठे घाटातील धबधबा, आढळा खोऱ्यात पट्टाकिल्ला,
सावरगाव पाट येथील तवा धबधबा, गर्दणी येथील शिवडोह धबधबा, सांगवी तलाव सांडवा ही पावसाळी पर्यटनाची बलस्थाने आहेत. ही सगळी पर्यटन स्थळे पाहता पाहता अगदी स्वर्गसुख लाभते हे नक्की.
आणखी काही ठिकाणे
निसर्गाचे वरदान लाभलेल्या तालुक्यातील भैरवगड- घनच्चकर पर्वत-कुमशेत धारेराव परिसरातील हिरवा निसर्ग पर्यटकांना अगदी बेधुंद करतो. रतनगड आणि हरिश्चंद्रगड यांच्या मधे आज्या पर्वत असून, या गडांच्या संलग्न सह्याद्रीच्या रांगेत घनच्चकर,
सुपली, करंडा, बुधला, नंदी, कात्राई, नवरा-नवरी व भैरवनाथगड ही डोंगररांग आहे. शिरपुंजे, कुमशेत-धारेराव, आंबित धरण आदी पर्यटन स्थळे नैनितालला आल्यासारखे सुख देऊन जातात.