विनापरवाना कोविड सेंटर सुरु करणाऱ्या हॉस्पिटलवर कारवाईचा इशारा

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 17 मे 2021 :- विनापरवाना कोविड हॉस्पीटल सुरु करून कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्याचा धक्कादायक प्रत वडाळा बहिरोबा येथे घडला आहे.

याप्रकरणी ग्रामपंचायतीने एफजेएफएम हॉस्पीटल चालकांकडे 2 दिवसात खुलासा मागितला आहे, खुलासा न मिळाल्यास गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, वडाळा बहिरोबा येथील एफजेएफएम रुग्णालयाने महिनाभरापूर्वीपासून कोविड रुग्णालय सुरु केले आहे.

या कोविड रुग्णालयाशी संबंधित एका व्यक्तीवर रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार केल्याचा गुन्हे अन्वेषण विभागाला वहिम आहे. यामुळे या रुग्णालयाचे प्रशासन वादात सापडले आहे.

ग्रामपंचायत पदाधिकार्‍यांच्या पार पडलेल्या मासिक सभेत मिशन हॉस्पीटलने सुरु केलेल्या कोविड हॉस्पीटलबाबत चर्चा करण्यात आली.

या हॉस्पीटलच्या वैद्यकिय अधिक्षकांना नोटीस काढून ग्रामपंचायत प्रशासनाची परवानगी न घेता कोविड रुग्णालय कसे सुरु केले?,

कोविड रुग्णालयात वापर करण्यात आलेला वैद्यकीय कचरा निष्काळजीपणाने उघड्यावर फेकून का दिला. या सर्व बाबींचा हॉस्पीटल व्यवस्थापनाने दोन दिवसांत खुलासा करावा,

अन्यथा त्यांच्याविरुद्ध साथरोग प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याचा इशारा ग्रामपंचायत प्रशासनाने दिला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe