Mula Dam : मुळा धरणातून जायकवाडीला पाणी सोडण्याबाबत निर्णय झाला आहे. मात्र मुळा धरणातून पाणी सोडू नये, तसेच मुळा नदीवरील सर्व केटीवेअर बंधारे पूर्ण क्षमतेने भरून द्यावेत,
अशी मागणी राहुरी तालुका पूर्व भाग मुळा नदी परिसर समस्या निवारण समितीचे अध्यक्ष उत्तमराव म्हसे, सचिव बाळासाहेब पेरणे तसेच समितीच्या सर्व सदस्यांनी तहसीलदार चंद्रजीत राजपूत यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, समन्यायी पाणी वाटप कायद्यानुसार जायकवाडीसाठी मुळा धरणातून पाणी सोडण्याबाबत गोदावरी मराठवाडा महामंडळाने आदेश दिले आहेत. त्यामुळे मुळा धरणातून जायकवाडीला पाणी जाणार आहे. हे जवळपास निश्चित झाले आहे.
परंतु सध्या जायकवाडी लाभक्षेत्रात पाणीटंचाई नाही. तसेच पुढे पाऊस झालाच तर आता गेलेले पाणी परत आणता येणार नाही. तसेच मुळा नदीवरील सर्व केटीवेअर बंधारे पूर्ण क्षमतेने भरून द्यावे, असेही म्हटले आहे.
सदर निवेदनाच्या प्रति जिल्हाधिकारी, कार्यकारी अभियंता, मुळा पाटबंधारे विभाग, खा. डॉ. सुजय विखे पाटील, आ. प्राजक्त तनपुरे, माजी आ. शिवाजी कर्डिले आदिंना दिल्या आहेत. या निवेदनावर राहुरी तालुका मुळा नदी परिसर समस्या निवारण समितीचे अध्यक्ष उत्तमराव म्हसे,
सचिव बाळासाहेब पेरणे यांच्यासह सदस्य शरदराव पेरणे, तानाजी धसाळ, दादासाहेब पेरणे, जालिंदर खडके, इंद्रभान पेरणे, सूर्यभान म्हसे, प्रमोद सुराणा, रविंद्र म्हसे, सुनिल मोरे, अशोक काळे, साहेबराव म्हसे, राहुल म्हसे, संभाजी पेरणे, लक्ष्मण म्हसे, दिलीप म्हसे, सुरेश भीमराव म्हसे, भाऊसाहेब देवरे,
अशोक म्हसे, रमेश चंद्रकांत म्हसे, पांडुरंग म्हसे, गोरक्षनाथ तारडे, अरुण डोंगरे, अनिल आढाव, संदीप आढाव, पंढरीनाथ आढाव, रविंद्र आढाव, उत्तमराव आढाव, उत्तमराम खुळे, साहेबराव तोडमल आदिंची नावे आहेत.