Ahmednagar News : पाथर्डी, नगर, राहुरी, नेवासा तालुक्यातील ४५ गावांमधील १०२ पाझर तलावासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या वांबोरी चारीला मुळा धरणातून सोमवारी पाणी सोडले जाणार आहे. वांबोरी चारी टप्पा दोन या योजनेचे लवकरच टेंडर काढून,
नोव्हेंबर महिन्यात कामास प्रत्यक्ष सुरुवात करण्यात येईल. अशी महत्त्वपूर्ण माहिती माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी लाभधारक शेतकऱ्यांशी बोलताना दिली आहे.

पाथर्डी तालुक्यातील चिचोंडी येथे वांबोरी चारी योजनेच्या लाभधारक शेतकऱ्यांची शुक्रवारी कर्डिले यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. यावेळी कर्डिले म्हणाले गेल्या दोन अडीच महिन्यापासून जिल्ह्यात कुठेही समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा व चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
पाण्याअभावी शेतकऱ्यांच्या फळबागा उभी पिके देखील संकटात सापडली असून शेतकरी सध्या पावसाअभावी अस्वस्थ आहे. मुळा धरण ७९ टक्के भरले असून, धरणातून वांबोरी चारीला पाणी सोडण्याची मागणी लाभधारक शेतकऱ्यांनी केली आहे. त्या अनुषंगाने सोमवारी मुळा धरणातून वांबोरी चारीला पाणी सोडण्यात येणार आहे.
तसेच पाथर्डी व नगर तालुक्यातील बारा गावांसाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या वांबोरी चारी टप्पा दोन योजनेच्या कामात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार सुजय विखे पाटील यांनी या योजनेच्या कामाकडे विशेष लक्ष केंद्रित केले असल्यामुळे टप्पा दोनच्या कामाचे लवकरच टेंडर काढून प्रत्यक्षात सुरुवात करण्यात येणार असल्याचे माजी मंत्री कर्डिले यांनी यावेळी सांगितले.
यावेळी कार्यकारी उपअभियंता जे. एम. पाटील, अभियंता व्हि. डी. पाटील, सहाय्यक अभियंता धनश्री शिंदे, माजी सभापती काशिनाथ पाटील लवांडे, जि.प.सदस्य पुरुषोत्तम आठरे, मार्केट कमिटीचे संचालक वैभव खलाटे, नारायण आव्हाड, धर्मांजी आव्हाड, बबनराव आव्हाड, देविदास आव्हाड,
अरुण रायकर, कुशल भापसे, एकनाथ आटकर, संतोष शिंदे, सुरेश चव्हाण, राजेंद्र दगडखैर, हनुमंत घोरपडे, रावसाहेब वांढेकर, साहेबराव गवळी, अण्णासाहेब शिंदे, बाबाजी पालवे, किशोर पालवे, महादेव गीते, प्रमोद गाडेकर, रवींद्र भापसे, शिवाजी कारखेले, अशोक दहातोंडे, शिवाजी डोंगरे, दिलीप गीते, प्रदीप टेमकर, दिगंबर कराळे, अन्सार शेख, रामनाथ शिरसाट यांच्यासह नगर पाथर्डी तालुक्यातील लाभधारक शेतकरी उपस्थित होते.
■ रावसाहेब म्हस्के नंतर कर्डिलेच : लवांडे
कोणताही राजकीय वारसा नाही प्रामाणिकपणे सर्वसामान्य माणसासाठी धावपळ करून त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करायची. कुटुंबापेक्षा जनतेला अधिक वेळ देण्याचे काम माजी आमदार रावसाहेब म्हस्के यांच्या नंतर माजी आमदार कर्डिले यांच्याकडून खऱ्या अर्थाने होत असल्याचे माजी सभापती काशिनाथ पाटील लवांडे म्हणाले.













