नेवाशाच्या विकासासाठी आम्ही आ. गडाखांबरोबर, म्हणत बेलपिंपळगाव परिसरातील विरोधी कार्यकर्त्यांचा गडाख गटात प्रवेश !

Published on -

नेवाशाच्या विकासासाठी आम्ही माजी मंत्री आमदार शंकरराव गडाख यांच्या बरोबर काम करणार, असे म्हणत नेवासा तालुक्यातील बेलपिंपळगाव परिसरातील अनेक विरोधी कार्यकर्त्यांनी नुकताच आमदार गडाख गटात प्रवेश केला.

गेल्या दोन वर्षांपासून भाजपचे अनेक नेते, विद्यमान जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्यांसह जिल्हा व तालुका भाजपचे पधाधिकारी गडाख गटात आल्याने भाजपचे स्थानिक नेतृत्व अडचणीत आले आहे. त्यात विधानसभेला भाजपमधे अंतर्गत संघर्ष पेटला आहे.

केंद्रात व राज्यात भाजपची सत्ता आहे. अनेक लोक भाजपमध्ये येत आहेत; परंतु गेल्या २ वर्षांपासून अनेक निष्ठावान भाजप पदाधिकारऱ्यांनी गडाख गटात प्रवेश केला आहे. पक्ष सोडताना स्थानिक भाजपचे नेते फक्त आपला राजकीय स्वार्थ पाहात आहेत.

कार्यकत्यांना वाऱ्यावर सोडले जात आहे. कारखाना तसेच अन्य निवडणुकां अंधारात बैठका घेऊन कार्यकर्त्यांना तोफेच्या तोंडी दिले जात आहे, असा आरोप त्यांनी भाजप तालुका नेतृत्वावर केला आहे.

बेलपिंपळगाव येथील भाजप कार्यकर्ते अनिल कोठुळे, रमेश शिंदे, भाऊसाहेब शिंदे, कमलाकर शिंदे, मोहन शिंदे, बाळासाहेब भद्रे, बाळासाहेब खांडे, विजय माने, गणेश पुंड, शिवाजी पुंड, विश्वभर शिंदे, दादासाहेब शिंदे, संभाजी शिंदे, बापूसाहेब शिंदे, आबासाहेब शिंदे, विलास शिंदे, फकिरा कांगुणे, नानासाहेब सुरसे, नवनाथ कांगुणे, गणेश कांगुणे, गणेश डुकरे, गणेश धीर्डे,

अरुण शिंदे, रवी पटारे, बाळासाहेब शिरसाठ, अशोक धीर्डे, राजेंद्र शिंदे, संजय शिरसाठ, बाळासाहेब येवले, सुनील शिरसाठ, दिगंबर बोरुडे, गणेश पुंड, प्रसाद पुंड, दत्तात्रय पुंड, राम पुंड, अनिल पुंड, संभाजी शिंदे, विजय शेरकर, रावसाहेब जगताप, रमेश पुंड यांनी आ. गडाख यांच्या नेतृत्वाखाली प्रवेश केला आहे.

घोंगडी बैठकांना प्रतिसाद

आमदार गडाखांच्या घोंगडी बैठकीला नेवासा तालुक्यातील अनेक गावांतून मोठा प्रतिसाद लाभला. ठिकठिकाणी आमदार गडाखांचे स्वागत करण्यात आले. परिसरातील सर्व कार्यकर्ते, ग्रामस्थ व शेतकरी आमदार गडाख यांचे विचार ऐकण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहात आहेत. गडाख यांचा तालुक्यातील सर्व गावांचा दौरा झाला असून पुढील महिन्यातही पुन्हा एकदा दुसरा दौरा चालू होणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News