संविधान व त्याच्या मूल्यांच्या रक्षणासाठी प्राणपणाने लढू,- आमदार डॉ. सुधीर तांबे

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 07 डिसेंबर 2020 :-भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून स्वातंत्र, समता, बंधुता व सर्वांना सामाजिक, राजकीय, आर्थिक न्याय देण्याचे अभिवचन दिले.

संविधान व त्याच्या मूल्यांच्या रक्षणासाठी प्राणपणाने लढू, असे प्रतिपादन आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केले. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरीनिर्वाण दिनानिमित्त डॉ. आंबेडकर पुतळा येथे आयोजित अभिवादन कार्यक्रमात डॉ. तांबे बोलत होते.

नगराध्यक्ष दुर्गा तांबे, मुख्याधिकारी डॉ. सचिन बांगर, पालिका अधिक्षक राजेंद्र गुंजाळ, कुसुम माघाडे, सुर्यकांत शिंदे, टी. व्ही. रुपवते, डॉ. रवींद्र घोसाळे, अ‍ॅड. अमित सोनवणे, प्रा. शशिकांत माघाडे, ए. पी. बनसोडे, के. एस. गायकवाड, दिलीप भोरुंडे, लक्ष्मीबाई अभंग, रावसाहेब पराड, हेमंत मेढे, विनोद गायकवाड यावेळी उपस्थित होते.

आमदार डॉ. तांबे म्हणाले, सामाजिक विषमता, गुलामगिरीचे दुःख आपण भोगले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक समता निर्माण करुन नवा भारत घडवला. त्यांनी जे आपल्याला दिले ते आपल्या हातून निसटून जाईल, अशी परिस्थिती निर्माण झाली. म्हणून घटनेच्या रक्षणासाठी आपल्याला लढा द्यावा लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.

नगराध्यक्ष दुर्गा तांबे, प्रा. शशिकांत माघाडे, दिलीप भोरुंडे, पत्रकार गौतम गायकवाड आदींनी यावेळी मनोगत व्यक्त केले. आभार अ‍ॅड. अमित सोनवणे यांनी मानले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment