अहमदनगर Live24 टीम, 15 नोव्हेंबर 2020 :- अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर अखेरीस मंदिरांची दरवाजे उघडणार आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बंद असलेली राज्यातील मंदिरे उघडण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे.
दिवाळी पाडव्या पासून राज्यातील मंदिरे आणि इतर धार्मिकस्थळे उघडण्यात येणार आहेत. मंदिरे उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे, मात्र शासनाच्या नियम अटी यांचे पालन करूनच भक्तांना देव पावणार आहे. याच अनुषंगाने नेवासा तालुक्यातील देवगड देवस्थानचे प्रमुख महंत भास्करगिरी महाराज यांनी भाविकांना आवाहन केले आहे.
कोरोनामुळे सगळीकडे वेगवेगळ्या टप्प्यात लॉकडाऊन घोषित करण्यात आला होता. आता राज्य सरकारच्या आदेशानुसार धार्मिक स्थळे सुरू झालेली आहेत, राज्य सरकारच्या या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. तसेच यानिमित्ताने दर्शनासाठी येणार्या भक्तांना आवाहन करतो
की आपण आपले आपल्या कुटुंबाचे व समाजाचे कोरोना या वैश्विक महामारीपासून बचाव करण्यासाठी शासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करत सार्वजनिक ठिकाणी तसेच प्रार्थनास्थळी जाताना सामाजिक अंतर पाळत, चेहर्यावर मास्क लावूनच जावे,
श्रीक्षेत्र देवगड संस्थान येथे येणार्या दर्शनार्थी भाविकांच्या स्वागतासाठी गोपूर ते महाद्वार हा संपूर्ण परिसर सुशोभित करण्यात आलेला आहे. दरम्यान सोमवारपासून मंदिरे सुरू होत आहेत तेव्हा हा आज निर्मनुष्य असलेला परिसर भक्तांच्या उपस्थितीने गजबजून जाईल.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved