अहमदनगर मध्ये हे काय घडलं ? चक्क बोअरवेलची मोटार १०० फूट उडाली हवेत !

Published on -

Ahmednagar News : बांधकाम करण्याकरिता पाण्यासाठी बोअरवेल घेत असताना शेजारच्या बोअरवेलमधील मोटार आणि सर्व साहित्य शंभर फुटापर्यंत हवेत उडाल्याची घटना

शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथे नुकतीच घडली. तसा व्हिडिओ सध्या सोशल मेडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

शेवगाव येथील सार्वजनिक बांधकाम खात्यामध्ये कार्यरत असलेले बोधेगाव येथिल विजय विश्वनाथ साळवे यांनी शेवगाव -गेवराई रोडवरील साईधाम येथिल गटनंबर १४२/४ मधील २४३ प्लॉटवर घराचे बांधकाम करण्याकरिता पाण्यासाठी बोअर घेतला.

दोनशे ते अडिचशे फुटांदरम्यान बोरला पाणी लागले परंतु बोर अजुन खाली जात असतांना लगतच शंभर फुटाच्या दरम्यान असलेल्या सोमनाथ आंधळे यांच्या बोरमधुन अचानक हवा आणि पाणी प्रचंड दाबाने बाहेर पडले.

यामध्ये बोरमधील वायररूप, पाईप, इलेक्ट्रिक केबल आणि मोटार हे सर्व साहित्य शंभर फुटापर्यंत हवेत उडून बाहेर पडले. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मेडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

जमिनीच्या भुगर्भात वेगवेगळे मातीचे पस्ते असतात बोअर घेतांना त्यातील माती बाहेर काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात हवेचा दाब दिला जातो. साईधाममधील घटना जमिनीतील एकसारखा पस्ता आणि पोकळी यामुळे लगतच्या बोअरमधुन हवा पास झाल्याने ही घटना घडली. – अरुण गरड, बालमटाकळी

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe