अहमदनगरमध्ये चाललंय काय ? मानसिक त्रास दिल्याने तरूणाने उचललं टोकाचं पाऊल

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगरमधून मागील काही दिवसात अनेक धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. आता आणखी एका घटनेनं खळबळ उडाली आहे. एकाने फोनवरून धमकावून व मानसिक त्रास दिल्याने

तरूणाने टोकाचं पाऊल उचलत आपलं जीवन संपवलं आहे. दिनेश कांबळे (रा. सिव्हील हडको) असे आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव असून त्याने राहत्या घरात गळफास घेतला.

दरम्यान पोलिसांनी या घटनेप्रकरणी तिघांविरूध्द गुन्हा दाखल करून घेतला आहे. याप्रकरणी मयत तरुणाचा भाऊ गणेश भीमराज कांबळे (वय २७, रा. मुंगुसवाडी, ता. पाथर्डी) यांनी तोफखाना पोलिसांत फिर्याद दिली.

त्यावरून वैष्णवी शिलवाने, वैष्णवी शिलवाने हिची बहिण (नाव माहित नाही), वैष्णवी शिलवाने हिचे दाजी (नाव माहित नाही) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास तोफखाना पोलिस करीत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe