Ahilyanagar News: रस्ते अपघातात दररोज जीव जाणाऱ्यांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढले असून सरासरी अपघातांचे जर प्रमाण बघितले तर ते मोठ्या प्रमाणावर आहे. यामध्ये खराब रस्ते तसेच वाहन चालकांचा निष्काळजीपणा देखील अशा अपघातांमागील प्रमुख कारण आहे.
अशीच एक दुर्दैवी घटना काल म्हणजे शुक्रवारी दिनांक 11 रोजी सकाळी 6 वाजून 45 मिनिटांच्या दरम्यान अहिल्यानगर-मनमाड महामार्गावर राहुरी फॅक्टरी परिसरामध्ये घडली.
यामध्ये कार आणि मालट्रक यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाल्यामुळे पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातामध्ये मृत दीपक गोविंद म्हसे व त्यांच्या पत्नी माया दीपक म्हसे असे या पती-पत्नीचे नावे आहेत. दोघेजण अहिल्यानगर येथे नातेवाईकाच्या दशक्रिया विधीसाठी जात असताना हा दुर्दैवी अपघात घडला.
राहुरी फॅक्टरी परिसरात अपघातात पती–पत्नीचा दुर्दैवी मृत्यू
अहिल्यानगर- मनमाड महामार्गावर राहुरी फॅक्टरी परिसरात कार व माल ट्रक यांच्यात झालेल्या अपघातात पती पत्नी जागीच ठार झाले. हा अपघात शुकवारी (दि. ११) सकाळी ६:४५ च्या दरम्यान घङला.
दीपक गोविंद म्हसे, माया दीपक म्हसे (रा. ममदापूर) अशी मयत दाम्पत्याची नावे आहेत. ते अहिल्यानगर येथे नातेवाईकाच्या दशक्रिया विधीसाठी जात असताना ही दुर्दैवी घटना घडली. दीपक गोविंद म्हसे व माया दीपक म्हसे हे दाम्पत्य ममदापूर येथून कोल्हार मार्गे अल्टो कार (एम.एच.१४- एव्ही-३३७२) या चार चाकी वाहनांतून अहिल्यानगर येथे नातेवाइकाच्या दशक्रिया विधीसाठी जात होते.
अहिल्यानगर- मनमाड महामार्गावर राहुरी फॅक्टरी परिसरात सकाळी ६:४५ च्या सुमारास सेल पेट्रोल पंपसमोर ते आले असताना नगरकडून शिर्डीकडे जात असलेल्या मालट्रक (के. ए. ०१- ए. एन-५७९७) ने म्हसे यांच्या चारचाकी वाहनास समोरून जोराची धडक दिली.
या अपघातात अल्टो मधील म्हसे दाम्पत्य जागीच ठार झाले.अपघाताच्या आवाजाने परिसरातील तरुणांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले रुग्णवाहिका चालक रवी देवगिरे यांच्या मदतीने मृतदेह शवविच्छेदनासाठी नेण्यात आले. अपघातस्थळी मोठी गर्दी झाल्याने वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.