अहमदनगर Live24 टीम, 23 डिसेंबर 2020 :- हल्ली पत्रकारितेलाही प्रेमाचा ‘गंध’ आहे…स्वार्थापुढे नैतिकताही जराशी ‘अंध’ आहे…’सकाळ’पासून कुठे आहेस, तू ‘बाळ’… झाले प्रकरण ‘सा-जरे’, तूच तुझा ‘काळ’…”… कवीकडून एक-एक वाक्य उच्चारले जात होते व नगर जिल्ह्यात गाजत असलेल्या रेखा जरे हत्याकांडाच्या संदर्भातील या काव्य रचनेला टाळ्यांची व हास्यकल्लोळाची दाद मिळत गेली.
ठिकाण होते, नगर जिल्ह्यातील पाथर्डी व निमित्त होते, तालुका साहित्य संमेलनातील काव्य संमेलनाचे. चितळीचे कवी-पत्रकार बाळासाहेब कोठुळे यांनी पत्रकारितेचा संदर्भ हत्याकांडाशी जोडून सादर केलेली ही कविता रसिकांना खळखळून हसवणारी व टाळ्यांचा कडकडाट मिळवणारी ठरली.
यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्ष रेखा जरे यांची निर्घृण हत्या, पोलिसांनी याप्रकरणी अटक केलेले ५ आरोपी व या हत्याकांडाचा मुख्य सूत्रधार असलेला व पसार झालेला पत्रकार बाळ ज. बोठे यांचा विषय सध्या माध्यम जगतामध्ये चर्चेत असला तरी या चर्चेला आणखी फोडणी साहित्यिकांकडून मिळू लागली आहे. रे
खा जरे व बाळ बोठे यांच्यासंदर्भात सूचक शब्दांची मांडणी करणारी कविता नुकत्याच पाथर्डीला झालेल्या तालुकास्तरीय साहित्य संमेलनात सादर झाली आणि उपस्थित रसिकांनी हास्यकल्लोळात व टाळ्यांच्या गजरात तिला दाद दिली. ”हल्ली पत्रकारितेलाही प्रेमाचा गंध आहे…
स्वार्थापुढे नैतिकताही जराशी अंध आहे… हा तर लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे… पत्रकारितेत त्यांचा तसा हात-खंडा आहे… ह्या लेखणीचा तसा तो जुनाच दोरी-गंडा आहे… जुन्या छत्रीला रोज नवा दांडा आहे… लोकशाहीच्या पदरातला हा धोंडा आहे… पोलिसही बेजार, लेखणीही लाचार आहे… रामायणातल्या वाल्याचा हा विचार आहे… सकाळपासून कुठे आहेस, तू बाळ….झाले प्रकरण सा-जरे, तूच तुझा काळ…”…अशी ही कविता रसिकांची दिलखुलास दाद मिळवून गेली.
पाथर्डीच्या श्री तिलोक जैन विद्यालयाच्या सभागृहात कृष्णा भोजनालय साहित्य मित्रमंडळाचे तालुका साहित्य संमेलन नुकतेच झाले. रविवारी (२० डिसेंबर) सायंकाळी निमंत्रितांचे कविसंमेलन व पुरस्कार वितरण झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य अशोक दौंड,तर प्रमुख पाहुणे म्हणून साहित्य परिषदेचे तालुकाध्यक्ष-पत्रकार अविनाश मंत्री, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. कैलास दौंड, कवी नागेश शेला, स्वागताध्यक्ष हुमायुन आतार उपस्थित होते.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved