मालाची विक्री करत ड्रायव्हरने रोकड केली लंपास

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 28 जानेवारी 2021 :- मालकाने डिलेव्हरी साठी दिलेला माल इच्छित स्थळी देऊन मालाच्या बदल्यात आलेली रोख रक्कम वाहनचालकाने परस्पर घेऊन लंपास झाल्याचींघटना राहुरी तालुक्यात घडली आहे.

याबाबत राहुरी पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, फिर्यादी फिरोज इक्बाल शेख (वय 38 वर्षे, रा. राहुरी) यांचा राहुरी शहरहद्दीत कोल्ड्रिंक्सचा व्यवसाय आहे.

आरोपी समिर जाफर शेख ऊर्फ हितेश प्रदीप बनकर रा. राहुरी खुर्द, हा फिरोज शेख यांच्या पिकअप गाडीवर चालक म्हणून काम करत होता.

दि. 22 जानेवारी रोजी सकाळी 9 वाजे दरम्यान व 25 जानेवारी रोजी दुपारी 3 वाजे दरम्यान आरोपी हा पिकअप गाडीमध्ये कोल्ड्रिंक्सचा माल घेऊन कुकाणा येथे पोहोच करण्यासाठी गेला होता.

माल पोहोच करून त्याने परस्पर मालाचे 50 हजार रुपये घेतले आणि पसार झाला. 50 हजार रुपयांची आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिरोज शेख यांनी राहुरी पोलिसांत धाव घेतली. त्यांच्या फिर्यादीवरून समिर जाफर शेख ऊर्फ हितेश प्रदीप बनकर याच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News